Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पडेल [ पतयालु disposed so fall. = पडआल = पड्याल, पडेल ] तो पहिलवान पडेल आहे.
कुस्तींत हार खातो त्याला पडेल, पड्याल+ म्हणतात. (भा. इ. १८३४)
पडोशी [ प्रत्यूषे = पड्डूसी = पडोषी, पडोशी ] पडीशी म्ह० पहाटे. (भा. इ. १८३४)
पड्या [प्रतीपः = पडिआ = पड्या ] मित्रः प्रतीपः = पड्या स्नेही म्हणजे उलट जाणारा मित्र.
पड्याल [पतयालुः ] (पडेल पहा)
पढतमूर्ख [ प्रति (नि) विष्ट = पडि (णि ) इट्ट = पडि (णि ) ट्ट = पडिट्ट = पडट्ट = पढत ] पढत हा शब्द प्रतिविष्ट किंवा प्रतिनिविष्ट शब्दापासून निघालेला आहे- पठ धातूशीं कांहीं एक संबंध दिसत नाहीं. (भा. इ. १८३४)
पढिअ [ प्रिय = परिअ = पढिअ. प्रियः = पढिओ ]
पढियंता [ प्री संतुष्ट होणें, प्रीयमाण = परीयन्त = पढियन्त (ता-ती-तें) loving, loved.
पढियो [ प्रतिग्रहः = पडिघो = पडिहो = पढियो ] प्रतिग्रह म्हणजे प्रेम, मर्जी. प्रथमा एकवचन. ( ज्ञा. अ. ९ पृ. ९)
पढीक [प्रधी + क very intelligent = पढीक ] very intelligent naturally. पढीक वैद्य a medical practitioner who is very intelligent but not regularly educated in the profession.
पण [ पणः (प्रतिज्ञा) = पण ] पणबंधः = पण बांधणें. पणजा [ आर्यक = अज्जअ = आजा. प्रार्यक = पज्जअ; पणतोंड शब्दांतील णच्या धर्तीवर = पणज्जअ पणाजा = पणजा ] (भा. इ. १८३३)
पणजा-जी-ज [प्रार्य्यक] (पाणजा पहा)
पणती [ पण्यस्त्री = पणती ] दिवटी, रांड.
पणतु-ती-त [ प्रणप्तृ = पणत्तु = पणतु-ती–त ] (स. मं. )
पणतोंड [ पणप्तृगंड = पणत्तुअंड=पणातोंड=पणतोंड ] (भा. इ. १८३३)
पणा, पण [प्रणय = पणअ = पण, पणा ] ती आपल्या पणांत आली = सा प्रणये प्रविष्टा