Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
निसते (समयीं) [निशीथे = निसीते = निसते ] निसते समयीं म्हणजे निशीथ समये.
निजते हा ज मध्य शब्द निराळा.
निशीथ ह्या शब्दांत शी शयन करणें हा घातू आहे. निशीथ म्हणजे शयन करण्याचा वेळ. (भा. इ. १८३४)
निसरडें १ [ निषद्वरं = निसरडें (चिखल ) ] निसरड्यावर चालूं नको म्हणजे पातळ चिखलावर चालू नको.
-२ [ नि:सरत् = निसरड ( डा-डी- डें) ] ( भा. इ. १८३२)
निसुक [ निःस्वक = निमुक ] दरिद्री. (भा. इ. १८३४)
निसूर १ [ नि + शूर (शूर स्तंभने, वेड्यासारखें स्तब्ध होणे, to be senseless)= निसूर senseless, idle.
-२ [ निस् + स्मृ = निसूर ] without memory, forgetfully.
निस्तोप [ निस्तुषं = निस्तोष] ज्यांत तूस राहिलें नाहीं तें, लाक्षणिक निर्दोष.
तूस काढलेले तांदूळ ते निस्तुष.
निस्तोष म्हणजे व्यंग, उणेपणा नसलेलें.
निहाळणें [ नि + भाल् = निहाळ (णें). न्याभाल् = न्याहाळ (णें ) ] निहाळणें हा शब्द न्याहाळणें असा हि उच्चारितात. भल ( भालयति, चुरादि ) , पहाणें निरीक्षणें. ( भा. इ. १८३२)
नी १ [ अन्यत्] (न पहा)
-२ [ न्वै ] ( नि २ पहा )
नीक ( का-की-कें) [ लीक (कं-का-क: ) ] अलीक = खोटें. लीक = खरें.
इतकेंच कीं हा लीक शब्द ग्रंथिक संस्कृतांत नाहीं. ज्ञानेश्वरींतील उपयोगावरून असें दिसतें कीं, हा शब्द प्रांतिक भाषेंत प्रचलित होता. (ज्ञा. अ. ९ पृ. ६०)
नीचनवा [ नित्यनवः = निच्च = नीच ]
नीचनवा म्हणजे नित्यनवा हा शब्द मराठी काव्यांत येतो.
नीट १ [ स्निग्ध ] (नीड पहा)
-२ [ स्निह् स्नीढ kind = नीट kind ] तो माझ्याशीं नीट आहे he is well desposed towards me.