Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

मंगरूळ - सं. प्रा. मंगलपुर. नाशिक, पुणें, ठाणें, साताण, सोलापूर, कुलाबा, नगर, विजापूर, हैदराबाद. ( शि. ता.)

मंगरूळवारी - (गांवावरून). खा प

मंगळणें - मंगलवनं. खा नि

मंगळवाडी - मंगलवाटिका. खा नि

मंगळूर - सं. प्रा. मंगलपुर. ( शि. ता.)

मचमाल - मंजु ( हंस ) - मंजुमालः खा इ

मंचर - महत्सरः = मच्चर = मंचर. हें जुन्नराजवळील एका गांवाचें नांव आहे. ही व्युत्पति जर खरी असेल तर पुरातन काळीं येथें मोठें सरोवर असावें. ( भा. इ. १८३४)

मंजरथ - मंजु ( हंस ) - मंजुरथ्या. खा इ

मजवाण - मंजु (हंस ) - मंजुवाइनं. ,,

मटखडकें - मट्टक. खा व

मटगव्हाण - मट्टकगवादनी. खा व

मटाण - मट्टक. ,,

मटामद - मट्टक - मट्टाम्रपद्रं ,,

मडवाणी - मठवाहनी. खा नि

मंडवी - मंटप - मंटपिका. ,,

मंडाणें - मंद (लोकनाम ) - मंदवनं. खा म

मंडोसर - मंडूकसरः = मंडोसर, मंदोसर (एक शहर).

मताणें - मत्त ( कोकिल ) - मत्तवनं. खा इ

मंत्राळें - मंत्रालयं. खा नि

मथवाड - मंथवाटं. खा नि

मंदाणें - मंद (लोकनाक) - मंदवनं. २ खा म

मंदोसर - मंडूकसरः. (मंडोसर पहा)

मनखडी - मणिखलिका. २ खा नि

मनवेल - मणिवेलं. ,,

मनापुरी - मनाका (हत्तीण) - मनाकापुरी. खा इ

मनूर - मणिपुरं. २ खा नि

मन्यारखेडें - मणिकार (जातिनाम ) - मणिकारखेटं. खा म

ममाणें - मन्मध = मम्महवनं = ममाणें. खा म

मरढें - महाराष्ट्रं = मरढँ = मरढें. सातारा प्रांतांत लिंबगोव्याजवळ मरढें गांव आहे. देवराष्ट्रें गांव मरढ्यापासून ३० मैलांवर आहे. (भा. इ. १८३२)

मर्‍हाड - महरट्ट. (वर्‍हाड पहा)

मलई - मलय (पर्वत देशनाम) - मलायिका. खा म

मलठण - मल्लस्थान (पैठण पहा )