Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

जातिनामव्युत्पत्तिकोश

ठाकर - तस्कर (a thievish tribe) = ठक्कर, ठाकर. पूर्वेतिहासकालीं तस्कर ही एक रानटी जात होती. त्यांचे वंशज ठाकर. (महिकावतीची बखर पृ. ८४)

ढोर - धिग्वण्या-योगवाज्जातः पुत्रो दुर्भरसंज्ञकः ।
स कुर्याच्चर्मपात्राणि जीवनाय निरंतरम् ॥
जातिविवेकः ॥ 
डोहरु इति ख्यातः ॥ 

धिग्वणीच्या ठाई अयोगवापासून झालेला जो पुत्र तो दुर्भर होय. तो चामड्याचीं पात्रें करितो. दुर्भर = डुहहरं = ढोर. (भा. इ. १८३४)

तांडेल-तांडा म्हणजे नावांचा किंवा नावेंतील खलाशांचा समूह. तांड्याचा जो पुढारी तो तांडेल. तांडेल-तांडेला हा धंदावाचक शब्द आहे. तंडक (समूह, ओळ ) + इरः (प्रेरक, चालविणारा) = तंडकेर (तांड्याचा चालक). तंडकेर= तांडेल (नावांचा किंवा नाविकांचा पुढारी ).
( महिकावतीची बखर पृ. ८० )

तांबट [ ताम्रकुट्ट = तामउट्ट = तामुट = तामट = तांबट ] ( भा. इ. १८३२ )

तिरगूळ - अपरान्तांत म्हणजे उत्तर कोंकाणांत सह्याद्रींत त्रिकूट नगर होतें. येथील राजांना व प्रजांना त्रैकूटक म्हणत. त्रैकूटक याचा प्राकृत अपभ्रंश वृद्धि जाऊन त्रिगुडअ असा होणें शक्य आहे. त्रिगुडअ याचें स्वल्पोच्चारित रूप त्रिगुड. हा त्रिगुड शब्द पद्मपुराणकारानें योजिला आहे, व तो प्राकृत आहे. ह्या त्रिगुड शब्दाचा मराठी अपभ्रंश तिर्गुळ तात्पर्य, तिर्गुळ हे ब्राह्मण आहेत व ते त्रिकूट ऊर्फ त्रिगुड या उत्तर कोंकणांतील प्रांतांत राहणारे होते जुन्नर व त्याखालील तळकोंकण यांत तिर्गुळांची वस्ती अद्याप हि आहे. त्रिकूट येथील राजे अभीर होते व त्रैकूटक ऊर्फ त्रिगुड ब्राह्मण दुष्टाचारवान् होते. सबब पद्मपुराणकाराच्यामतें पंक्तिदूषक होते. ( भा. वार्षिक इ. १८३६)
लोकांचें नांव ऐकू येतें.

तुषार - (१) विष्णुपुराणाच्या चतुर्थांशाच्या चोविसाव्या अध्यायाच्या तेराव्या कलमांत खालील वाक्य आहे:-

" ततश्चाष्टौ यवनाः, चतुर्दश तुषाराः,
मुंडा श्च त्रयोदश, एकादश मौनाः । ''

ह्या वाक्यांतील चतुर्दश तुषार कोण व कोठील हें शोधावयाचें आहे.