लेखांक ४०.

श्री.

'' म॥ मोकदम मौजे वडगाव ता। गुंजणमावळ यास देशमुख व देशपांडे ता। मजकूर सु॥ सन खमस अर्बैन मया अलफ. मौजे मजकूरी रकमदस्त खंडी १३ तेरा आहे. त्याची उगवणी करावी तो जमीन मोचट, यामुळे कुळे येऊन कीर्द करून दिवाणचा टका उगवणी नव्हे. याकरितां मोकदम याणे येऊन विनंति केली की, दस्तांत सोडी देऊन बाकी दस्त राहील त्याची मुलुक सिरस्ता उगवणी करून देईन. त्यावरून राजश्री राघो व्यंकटेश नामजाद किले राजगड याजपासी वर्तमान निवेदन केले. त्याणी राजश्री पंतसचिव स्वामी यांजपासी विनति केली. त्यावरून तुजला मौजे मजकूरच्या लावणीवर नजर देऊन, मौजे मजकुरास रकम दस्त सोडी खंडी ३ तीन पत्र मौजे मजकुरास सादर केले असे; आणि तुवा येऊन विनंति केलीस की, आपल्यास या पत्राप्रमाणे सोडीचे पत्र दिल्हे पाहिजे ह्मणऊन विनंती केली. त्यावरूनं तुजला हे पत्र दिल्हे असे. या सोडीस तुजपासून सेरणी दिवाणचे पत्री आहे तेणेप्रमाणे उगवणी करून आपले पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने दस्त खंडी १० दाहाची उगवणी करून सुखरूप राहाणे. दिवाण पत्रांत सोडी खंडी तीन आहे परंतु पूर्वीची बोली चौ खंडीची होती, याकरिता मौजे मजकूरचा पाटील व भोवरगावचे पाटील याणीं बोलीचा अतिशय केला, याकरितां दिवाणातून चौथी खंडी करार करून दिल्ही जाईल.

साक्षी

१ भिकाजी लेकवळा पाटील मौजे माहरी। बु॥ १ कावजी भगत पा। मौजे सोनवडी
१ तुकाजी इंगुलकर मो। मौजे आडाली १ बरवाजी दिघा पा। मौजे कतकवणे
१ सकराजी सरजाम प॥ मोजे साडे १ सूर्याजी वेणुडिर खोत मौजे सांगवी बु॥
१ दिमजी ता। आबवण