एणेप्रमाणे आपलाले जमाव घेऊन मोहिमेस आलों. कष्ट मेहनत जे करावयाची ते उभयतासमागमे हुकुमाप्रमाणे केली. खोकरी राजापुरी कुल देश दुर्गे रायगडासहवर्तमान हस्तगत जाहालिया, खुशालीच्या प्रसंगी मावलप्रांतीच्या जमींदाराचे बरे करावे, इसाफतीच्या गावास मोगलाई बसली आहे ते माफ करून सोडावी, व स्वराज्यपैकी बाबती वसूल घेतात व ऐनदस्तपैकी तिजाई घेताती, त्यास यापैकी ऐनदस्त बाबती स्वराज्याची बेरीज येक करून तिजाई मात्र घ्यावी, ह्मणून विदित केलें. त्यावरून तुमचे श्रम चित्तांत आणून तुह्मी विनंति केली त्याप्रमाणे तह मान्य केला असे.
तुमचे इनामाचे गाव १ मौजे कुरंगवाडी १ मौजे तांभाड १ मौजे चिंचले बु॥ १ मौजे चिंचले खुर्द .॥ मौजे केतकवणे ----- ४॥. |
किता इनाम गाव १ मौजे पाली इसाफती १ मौजे बोपे १ मौजे करनवडी देशपांडे ----- ३ |
वावेली मोकदम माची व माहाराची माहारकी गावगना सुदामत आहेत त्यास चव्हाटेचे गावीची मोगलाई माफ केली असे. स्वराज्याची आकाराची इनाम तिजाई घ्यावी कलम १ |
सदरहू देह ४॥ साडेच्यार येथील पाहाणी खंडीच्या पिकास साडेच्यार मण धरावी. या प्रो। जो आकार होईल त्यापैकी दोनी तक्षिमा स्वराज्य एक तक्षीम मोगलाई माफ केली असे दोनी दोनी तक्षिमा स्वराज्यापैकी इनाम तिजाई तिसरी तक्षीम घ्यावी. कलम १ |
एकूण देह ३ हे गावगना इनाम शेते |
काराची इनाम तिजाई |
वणी घरटका नख्त |
एणेप्रमाणे साहा कलमे तह केला असे. या तह बरहुकूम तुमचे चालविले जाईल. कदाचित् माहाल सिरिस्तीयाने पाहणी होवी ते न जाली, खंडणीच जाहाली, तरी या तहाने च चालविले जाईल. याखेरीज किरकोली पटियाचा तगादा लागणार नाहीं. जाणिजे. छ १२ मोहरम.''
सुरु सुद बार