लेखांक ४१.
श्री.
'' श्रीमंत माहाराज मातुश्री आईसाहेब याणीं र॥ सिलीमकर ता। गुंजनमावळ यांसी आज्ञा केली ऐसी जे. राजश्री यमाजी शिवदेव यांणी जावली प्रांते फौज पाठऊन दंगा केला आहे, त्याचें पारपत्य करणें हें साहेबांस अवश्यक जाणून तुह्मास आज्ञापत्र सादर असे. तर तुह्मी व कंक व मालुसरे व खोपडे व जेधे ऐस एकत्र होऊन राजश्री मोरो धोंडदेव सुभेदार व आपाजी पारठे समस्त सरदार यास सामील होऊन, गनीम पारचे ठाणियास गेला आहे त्याजवरी जाऊन धुडाऊन देणे. आणि आपले शेवेचा हुजूर मजरा होऊन साहेब संतोसी होत ते गोष्ट करणें. आणि स्वामिसेवा एकनिष्ठेने केलिया साहेब तुमचे उर्जित करितील ऐसें जाणून गनीमांचे पारपत्य बरे रवेसीने करणे. जाणिजे. छ ५ रबिलाखर सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ.''
लेखांक ४२.
श्री.
''राजश्री हैबतराव मायाजी सिलमकर देशमुख
ता। गुंजणमावळ गोसावी यांसी :-
।।ε अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्नो माधवराव तुकदेव रामराम विनंती उपरी येथील कुशल जाणौन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष :- आपण पत्र पाठविले ते पावोन लेखनार्थे संतोष जाला. ऐसेस सदैव पत्र पाठवून संतोषविले पाहिजे श्नेहास उचित आहे.
दोहरा.
कज्जल तजे न शामता, मोति तजे न सेत ॥
दुर्जन तजे न कुटिळता, सज्जन तजे न हेत ॥१॥
श्लोक.
गिरीर्मयोरे गगने पयोधरे । लक्षांतरे भानुजले सुपद्मं ॥
द्विलक्ष सोमो कुमुदोत्पलानि ॥ श्नेहेशु मैत्रिर्न कदापि दूरः ॥१॥
आह्माकडील वर्तमान यथास्थित असे. वाघाचे कातडे लौकर मिळऊन पाठवणे. जवाद्या मांजराचा आंड कोणकोणास सांगत जाणे. मिळाला तर तुह्मी लोभास न येणे. आह्मास पाठऊन देणे. लोभ कीजे हे विनती.''