लेखांक ३८.
श्री.
'' ॥ε म॥ अनाम देशमुख व देशपांडे ता। गुजण मावळ यांसी नारो शंकर सचिव सु॥ सलासीन मया अलफ. किले राजगडचे लोक हुजूर कसबे उंबरजेच्या मुकामास विशाळगडच्या मोहिमेस आणिले होते. त्यांणी विदित केलें की, वतनदार हक बेमहंलग वसूल आह्मापासून घेतात, त्याचा तह करून दिल्हा तरी आपण किलाचाकरी करून, नाहीतरी आपण किला शेवा करीत नाहीं ह्मणून विनंती केली. त्यावरून हे पत्र तुह्मांस सादर केले असें. तरी तुमच्या हकाची मोईन असतां बे-मोइनी हक घ्यावयास गरज काय ? याउपर हकदारीचा तह खंडिच्या आकारास हक घ्यावा.
देशमुख | देशपांडे | गावकुलकर्णी |
१ | १। | १ |
एकूण अडीच मण हक वसूल घ्यावा. तैसाच नख्ताचाहि तह आहे. दर सदे देशमुख रु॥ ५ देशपांडे रु॥ २॥ कुलकर्णी ५ एणेप्रमाणे हकाचा तह आहे. त्याप्रमाणे तुह्मीं वसूल घेणें. जाजती तगादा न लावणें. छ १५ जमादिलौवल प॥ हुजूर बार सुरु सुद बार.''
लेखांक ३९.
श्री.
'' ॥ε मा। अनाम देसमुख व देशपांडे ता। गुंजणमावळ सुभाप्रांत मावळ यांसि नारो शंकर सचिव सु॥ अर्बा सलासैन मया व अलफ. तुह्मी राजपुरीचे मुकामी विनंति केली की, शामलावरी मोहीम राजश्री स्वामीनी केली. फौजा देऊन राजश्री फत्तेसिंग भोसले व राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान ऐसे अखेर वैशाखमासी रवाना केले. पदाती जमाव मावलप्रांतीचा स्वामीनीं यासमागमे जाऊन स्वामिकार्य करणे ह्मणून आज्ञा केली, व राजश्री आनंदराऊ बहिरव यासमागमे जमाव रवाना केला. त्यांसमागमे आपण स्वारीस एणे प्रमाणे आपले जमावानसी आलों. नावनिसी बितपसिल :-
प्रतापजी बिन संताजी हैबतराऊ सिलीबकर देसमुख १ |
शंकरराऊ बिन चांदजी हैबतराऊ देसमुख १ |
पदाजीराऊ बिन विठाजी हैबतराऊ देसमुख १ |
पुनाजी बिन संताजी नाइक देसमुख १ |
सूर्याजी बिन ह्माकोजी- राऊ सिलींबकर देसमुख १ |
जावजीराऊ बिन त्रिंबक- राऊ सिलींबकर देशमुख १ |