लेखांक ३७.

श्री.
१६४९ चैत्र वद्य १२.

''राजश्री सामजी हरी नामजाद व कारकून वर्तमान
व भावी प्रांत मावळे गोसावी यांसी :-

.॥ε अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य सेवक नारो शंकर सचिव नमस्कार सु॥ सन सबा अशरैन मया अलफ. एसजी बिन रायाजी झांजा मोकदम मौजे वडगांव ता। गुंजणमावळ यास मसाला हुजूर आणिले आणि मौजे मा।रचे मोकदमीचा करीना कैसा आहे तो दखल करणें ह्मणून आज्ञा केली. त्यावरून येसजी झांजा याणे विदित केले कीं, राजश्री थोरले कैलासवासी स्वामी किले राजगडी होते ते प्रसंगी मौजे मजकूरास मोकदम कोण्ही नव्हता. याकरिता आपला आजा बकाजी यास मौजे मजकूरचे मोकदमीचे वतन देशमुख व देशकुलकर्णी ता। मा।र याणीं करून दिल्हे आहे. आपल्या आज्याने मोकदमीचे वतन अनभविलें. त्यावरी आपला बाप रायाजी पाटीलकी करीत असतां मोगलांची धामधूम जाली. शाबदीखान पुणियास येऊन राहिला. त्याचा धावण्या मावळांत होऊ लागल्या. याकरिता गाव खराब जाला. आपला (बाप) देशावरी गेला. त्यावरी चालीसा वर्षांनीं आपण या प्रांतास गावावरी आलो आणि मोकदमीचे वतन अनभवित आहो. नवे वतन आपण घेतले नाही. ह्मणून विदित केलें. त्यावरून देशमुख व देशपांडे ता। मा।र यांस आणून, ये गोष्टीचा करीना पुसिला. त्याणीं सांगितले की, वतनाची पत्रें आपणाजवळ नाहीत व सेरणी दिल्ही की नाही हे दखल नाही ह्मणून सांगितले.. त्याप्रमाणें तुवाहि विदित केले. त्यावरून ऐसे दिसोन आले कीं, वतनदार होऊन सेरणी दिल्ही नाही. याउपर सेरणी देऊन मोकदमीचे वतन आपल्या दुमाले करून घेणें ह्मणून येसजीस आज्ञा केली. त्यावरून त्याचे विशई देशमुख देशपांडे यांणीं विनंति केली की, येसाजी बेमवसर आहे. जीवनमाफिक सेरणी करार करावी ह्मणून विनंती केली. त्यावरून मौजे मा।रच्या मोकदमीचे वतन याचे दुमाला करून, याजकडे वतन समंधे सेरणी स्वराज्य व मोगलाई रुपये करार करून, हुजूर वसूल घेतला असे. तरी मौजे मा।रचे मोकदमीचे वतन यास व याच्या पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने चालवणे. या पत्राची प्रति लेहून घेऊन असल पत्र याजवल भोगवटीयास परतोन देणें. छ २५ साबान पा। हुजूर. बार सुरु सुद बार.''