लेखांक ३५.

श्री.
१६३१ पौष वद्य १२.

''राजश्री विष्णु विस्वनाथ हवलदार दुमाहाल
त॥ गुंजनमावळ गोसावी यासि :-

सेवक सायजी हरी नामजाद व कारकून सुभा मावल नमस्कार सुहूर सन असर मया अलफ मा। प्रताबजी बिन संताजी हैबतराव सिलींबकर देशमुख ता। मजकूर याच्या इनामतीची तिजाई व हकाची चौथाई राजश्री पंचसचिव स्वामिनीं माफ करून सनदा दिल्या आहेत. ऐसियास, मा। निलेच्या हकाची चौथाई व इसाफती पाली हा गाव इनामती आहे त्याची तिजाईचा तगादा न लावणे जाणिजे. छ २५ जिलकाद मोर्तब सुद.''

लेखांक ३६.

श्री.
१६४८ ज्येष्ठ वद्य ३०.

''आज्ञापत्र राजश्री पंतसचिव ता। येसजी झांज्या मोकदम मौजे वडगांव ता। गुंजण मावळ सु॥ सन सबा असरैन मया अलफ. मौजे मजकूरची मोकदमीबदल सेरणी श्वराज्य व मोगलाई देखील सरदेशमुखी व सावोत्रा रुपये २०० दोनसे करार केले. त्याचा वसूल राजश्री दामाजी कासी याचे विद्यमाने हुजूर हुजत सुद पोता जमा असेत. जाणिजे. छ २९ साबान पा। हुजूर बार सुरु सुद बार.''