लेखांक २९.

श्री.
१६२५ पौष शुध्द १५

'' राजश्री शामजी हरी नामजाद व कारकून
वर्तमान भावी प्रांत मावल गोसावी यासि :-

अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य सेवक शंकराजी नारायण सचिव नमस्कर सु॥ सन अर्बा मया व अलफ. म॥ प्रतापजी हैबतराऊ सिलंबकर देशमुख त॥ गुंजनमावल याचे बाप संताजीराऊ सिलंबकर वतनामुळे राजगड नामजाद ठेविले होते. अशाच किले मजकुरास औरंगजेबाचा परीघ आला. खासा मोर्चा माची सुवेला किले मजकूर येथे तटानजिक भिडला आणि लगड केला. ते समई संताजीराव याणीं हिमत धरून गनीमासी युध्दप्रसंग शर्तीनसी करून गनीम मारून काढिला. तों अकस्मात गनिमाकडील भांडियाचा गोळा येऊन लागतांच स्वामिकार्यावरी ठार जाले. संताजीराऊ याणी शर्ती करावयाची तैसी केली. गनीम मारून काढिला. मशारनुले स्वामिकार्यावरी खर्च जाले. अशासइनामाची तिजाई व हकाची चौथाई देशमुखापासून दिवाणांत वसूल घ्यावयाचा तह आहे, त्यास प्रस्तुत संताजीराऊ स्वामीकार्यावरी खर्च जाले याकरितां प्रतापराव सिलंबकर देशमुख ता। मजकूर यास इनामाची तिजाई व हकाची चौथाई माफ केली असे. तरी सदरहूचे तोष्ट साल दरसाल लावित नव जाणे. प्रतिवर्शी नूतरपत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची तालिक लेहोन घेऊन असल पत्र भोगवटीयास फिराऊन देणे. छ १३ रमजान सुरुसुद बार पो॥ छ २१ मिनहू.''