लेखांक ३०.

श्री.
१६२५ पौष वद्य २

'' ॥ε म॥ अनाम प्रतापजी हैबतराऊ सिलिंबकर देशमुख ता। गुंजणमावळ यास शंकराजी नारायण सचिव आशिर्वाद सुहुरसन अर्बा मया अलफ. तुमचे बाप मा। संताजी हैबतराऊ वतनमुळें किले राजगडी नामजाद ठेविले होते. अशाच किले मजकुरास सालमजकुरी औरंगजेबाने परिघ घातला. खासा पादशाही मोर्चा माची सुवेळेच्या तटा खाले भीडला. गनीमानें लगट केला, ते समई मशारनिले याणीं हिमत धरून गनीमासी युध्दप्रसंग केला. गनीम मारून काढिला. तरवारेची शर्त करावयाची ते केली ! ते प्रसंगी भांड्याचा गोळा गनीमाचा लागोन, स्वामिकार्यावरी ठार जाले. त्यावरी तुह्मी हुजूर येऊन विनंति केली की, राऊ मशारनिले आपले बाप याणीं स्वामिकार्यावरी देह दिल्हा आहे. आपलें कुटुंब थोर, अन्नवस्त्र चालिले पाहिजे. आपले देशमुखीचा हक आहे. त्यास आपल्यास वारिसदार बहुत आहेत. याकरिता आपले तक्षिमेस हक एतो तेणेकरून आपला योगक्षेम चालत नाही. तरी आपल्यास कदीम हक आहे त्याखेरीज जाजती नूतन हक रयत नि॥नें करून दिल्हा तरी तेणेकरून आपला योगक्षेम चालेल. आपले बाप स्वामिकार्यावरी पडिले आहेत. आपणहि स्वामिकार्यावरी एकनिष्ठपणे आहों. ह्मणून हुजूर विदित केले. एसियास तुमचे बाप स्वामिकार्यावरी पडिले, तुमचा योगक्षेम चालिला पाहिजे, याजकरिता तुह्मास नूतन हक रयतेनि॥नें कदीम हक व तुमचे वारीसदार खेरीज करून जाजती हक दर गांवास मोईन करून दिल्ही असे. अज देह ८१ वजा इनाम देह ६॥ बाकी खालिसा देह ७४॥ साडे चवर्‍याहातर देह यास दर गावास हक मोईन गला कैली माहालमापे ε २ दोन मण व नख्त टके ५ ε पांच ऐणेंप्रमाणें नूतर हक ज्याजती मोईन करून दिल्ही असें. तुह्मी व तुह्मी आपले पुत्रपौत्रादि वौशपरंपरेने सदरहू नूतर हक अनुभवीत जाणे. या नूतर हकास वरकड तुमचे वारीसदारास समंध नाही. छ १५ रमजान प॥ हुजूर.''

बार सुरू सूद बार.