लेखांक २५.

श्री.
१६२५ पौष शुध्द १५

''राजश्री प्रतापराऊ सिलमकर सेनापंचसहश्री गोसावियांसि :-

॥ अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित शंकराजी नारायण सचिव आशिर्वाद सु॥ अर्बा मया अलफ. पेशजी तुह्मांस हशमाची पंचहजारी होती. हाली कामाचे मर्दाने तरवारेचे स्वामिकार्यास एकनिष्ठ देखोन तुह्मास सेनापंचहजारी सांगितली असे. तरी तुह्मी जमाव करून स्वामिकार्य एकनिष्ठपणे करीत जाणे. तुह्मांस वेतन सालीना होन पातशाही देखील चाकर होन १५०० दीडहजार होन वेतन करार केले असे. इ॥ सनद-पैवस्तगीपासून वजावाटाव दंडकप्रमाणे वजा करून उरले वेतन माहे दर माहे घेत जाणे. चाकर हजीर होतील ते दिवसापासून चाकराचा हक घेणे. पूर्वील सेवेचे फाजिल असेल ते हाली हकांत वजा करणे. तुह्मास जमान कानोजी जुझारराऊ देसमुख ता। कानदखोरे घेतले असे. छ १३ रमजान सुरू सूर बार.''

लेखांक २६.

श्री.
१६२५ पौष शुध्द १५

'' राजश्री प्रतापजी हैबतराऊ सिलींबकर सेनापंचसहश्री गोसावियांसी :-

॥ ε अखंडित लक्ष्मी अलंकृत राजामान्य श्ने॥ शंकराजी नारायण सचिव आशिर्वाद सु॥ अर्बा मया अलफ. तुमचे सेनापंचसहश्रीचें भरतीस म॥ पदाजी राऊ सिलिंबकर पेशजी उमेदवार होते. हाली कामाचे मर्दाने तरवारेचे देखोन यासि जुमला सांगितला असे. यासि वेतन सालीना होनु पा। देखिल चाकर ३०० तीनसे होन वेतन करार केले असे. पैवस्तगीपासून वजावाटाव दंडकप्रो। वजा करून, उरले वेतन माहे दर माहे पावीत जाणे. मोईनप्रमाणे चाकर हजीर करितील त्या दिवसापासून चाकराचा हक देणे. यांसि जमान पंचसहश्रीमजकुरी घेणे. छ. १३ रमजान सुरु सूद बार.''