[२५३] ।। श्री ।। २७ सप्टेंबर १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः
पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं विनंतिपत्रें श्रावण वद्य १४ चीं पाठविलीं तीं भाद्रपद वद्य द्वितीयेस पावलीं. चिरंजीव राजश्री भाऊंकडील व पठाणाचें व सुज्याअतदौलाकडील व अलीगोहर शाहाजादे याकडील वर्तमान विस्तारें लिहिलें तें कळलें. या उपरिहि तिकडील वर्तमान विस्तारें वरच्यावर लिहीत जाणें. या दिवसांत तिकडील मनुष्याचा अर्थ विस्तारें जलद लेहून यावा. तदनुरूप त्वरेनें सर्व लिहीत जाणें. जाणिजे. छ १७ सफर, सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. हे विनंति.