[२५२] ।। श्री ।। २७ सप्टेंबर १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः
पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. श्रीमध्यें ब्राह्मणांचीं वर्षासनें आहेत. त्यांचा ऐवज झाडून वे॥ राजश्री बाळकृष्ण दीक्षित यांजकडे पावता करणें व दहा हजार जाजती देणें ह्मणोन दोनचार वेळ तुह्मांस लिहिलें. त्यास दोन साला वर्षासनाचा ऐवज दिल्हा व दहा हजार रु॥ जाजती दिल्हे, तीन साला वर्षासनाचा ऐवज राहिला तो अद्याप पावला नाहीं, ह्मणोन दीक्षितांचें पत्र आलें. त्यावरून तुह्मांस लिहिलें आहे. तरी तीन सालांचा वर्षासनाचा ऐवज नेमणूकप्रें।। दीक्षितांकडे श्रीमध्यें पावता करून कबज जाणून पाठवून देणें. या गोष्टीस आळस सहसा न करणें. याखेरीज श्रीमध्यें दीक्षितांकडे अनुष्ठानाचे खर्चाबद्दल रु॥ १५००० पंधरा हजार देविले आहेत, त्याची वरात अलाहिदा पाठविली आहे. तो ऐवज पत्र पावतांच जलदीनें श्रीस पोहचावून कबज जाणून पाठवणें. जाणिजे. छ १७ सफर सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. + बहुत काय लिहिणें. वारंवार ताकीद असून धर्माचा३१२ ऐवज न पावणें, अपूर्व आहे! आतां दिवाळीपर्यंत वर्षासनाचा पहिलेप्रें॥ देखील सालमजकूर व जाजती दहा हजार, सनद पेशजी पावली त्याप्रें॥, व हालीं अनृष्ठानाचे पंधरा हजार दीक्षितांजवळ पावते करून कबज येथें घेऊन पाठवणें हे विनंति.
वार.