[२४८]                                      ।। श्री ।।            २४ सप्टेंबर १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः

पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. सरकारांत कडूपडवळाचें वगैरे प्रयोजन आहे, तरी जरूर पाठवणें. बित॥

→तीन जिनस यादी वाचण्यासाठी इथे क्लीक करा

येणेंप्रें॥ तीन जिनस सत्वर तलाश करून जरूर पाठवून देणें. फारच प्रयोजन आहे. तरी सत्वर पाठवणें. जाणिजे. छ १४ सफर, सु।। इहिदे सितैन मया व अल्लफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.