[२४७] ।। श्री ।। २१ सप्टेंबर १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः
पोष्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ भादो सुध ११ मु॥ गुलोली जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. कपिलाषष्ठी महापर्व आहे. चिरंजीव बाबास आणविलें आहे. सडे येतील. तुह्मींहि येणें. वरचेवर स्नान करून येऊन मौजे गुलौलीस लागलों. तेथली शनवारीं फत्ते झाली. आणीक दो गडी खाली झाली. येक दोन राहिली ते आज खाली होतील. सत्वर सर्व येणें. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.