[२४१]                                      ।। श्री ।।            ४ सप्टेंबर १७६०.

सेवेसी३०९ विज्ञापना मोहन ब्राह्मण मुजरद कावड देऊन अंतोबाच्या घरास प॥ आहे. त्याचे घरचेंहि बहुत दिवस वर्तमान कळत नाहीं. त्यास, दोन माणसें आपलींहि याजबराबर देऊन वर्तमान आणवून लेहून पाठवले पाहिजे. खर्चास कांही प्रविष्ट करावें. आजपर्यंत समस्त सुखरूप आहों. पुढें निभावून येऊन स्वामीचे पाय अवलोकन स्वामीच्या पुण्यप्रतापें होईल. शाहाजादा सुज्यातदौला कु-यानजीक अद्यापि आहेत. पुढें कांहीं दिल्लीकडे जात नाहींत. आह्मांकडून दोनचार मुजरद पत्रें सेवेसी गेली आहेत. परंतु, उत्तर येत नाहीं. मार्ग चालत नाहीं, यास्तव येऊन पावत नसतील. खिमोले कासीद पाठविला, चार महिने झाले, परंतु जाब येत नाहीं. त्याची गती काय आहे. ईश्वर जाणें. सर्वदां पत्रीं कुशलार्थ ल्याहावयास आज्ञा करून सेवकास आराम होय तें करावें. इकडील वर्तमान सेवेसी वरचेवर लिहीत जाईन. सवेसी श्रुत होय. हे विनंति. समस्त मंडळीस साष्टांग नमस्कार. लोभ कीजे. हे विनंति.