[२४०]                                      ।। श्री ।।            ४ सप्टेंबर १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यास:

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. ब॥ देणें अजुरा खर्च मोहनभाई वगेरे यांजबरोबर श्री गंगाजळ कावडी प्रयागीहून वे॥ दीनानाथ प्रयागवळ याणीं पाठविल्या होत्या त्यास अजुरा--------------------------------रुपये.

२४० गंगाजळ कावडी ४० दर ६.
६४ मिठै व अनार कावडी ८ दर ८.
२० गुलकंद कावडी २ दर १० प्रें॥
३२४  


येकूण तीनशे चोवीस रुपये तुह्मांकडून देविले असेत, तरी प्रांत बुंदेलखंड वगैरे महाल येथील ऐवजीं पावते करून पावलियाचे कबज घेणें. जाणिजे छ २३ मोहरम सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.