[२३५]                                      ।। श्री ।।            २७ आगष्ट १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः

स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. इकडे तमाम तोफखान्याचा बंदोबस्त करून एका जुटीनें मजबुतीनें लढाई करणें लागतें. याकरितां तुह्मापाशी राजश्री रूपराम अडारूचे भाऊ वगैरे, पठाण रोहिले असतील, ते चारशेंपर्यंत देखत पत्र हुजूर पाठवून देणें. ते लोक अशा लढाईचे कामाचे आहेत. जरूर या प्रसंगी असावे लागतात. तरी सत्वर पाठवून देणें. पैकियाची तरतूद लौकर करणे. पाठवून देणें. विलंबावरी न घालणें. खर्चाची ओढ फार आहे, ह्यणोन लिहिलें असे. तरी सत्वर पाठवून देणें. दिरंगाईवरी एकंदर न घालणें. छ १४ मोहरम. हे विनंति.