[२३४] ।। श्री ।। २६ आगष्ट १७६०.
श्रीमंत राजश्री गोविंदपंतदादा स्वामीचे सेवेसीः
आज्ञाधारक शिंदाप्पाशेट वीरकर३०५ रामराम विनंति उपरि येथील कुशल त॥ छ १४ माहे मोहरम जाणून मुकाम लष्करनजीक दिल्ली जाणून स्वामींच्या कृपेंकरून सुखरूप असो. विशेष. आपल्याकडून बहुत दिवस पत्र येऊन साकल्य वृत्त कळत नाहीं. तरी ऐसें नसावें. सदैव पत्रीं सांभाळ करावा. प्रस्तृत सरकारांतून श्रीमंतांनीं वरात आपल्याकडे रु॥ १५००० पंधरा हजारांची दिली आहे. ती वरात बजिन्नस शुभकर्ण ब्राह्मण याजबरोबरी स्वामींकडे पाठविली आहे. तरी ऐवज रसदेच्या ऐवजीं देविला असे. तरी हे रु।। पंधरा हजार जालोनास देविलिया आह्मास पोहोचतील. तेथें आमचा खरीदीचा खोळंबा न होय तें करावें. सर्व प्रकारें स्वामीचा भरोसा जाणून वरात आपल्याकडे घेतली आहे. येथील कामकाज आह्मा ल्याख जें असेल तें आज्ञा करावी. सेवेसी सादर असो. रु।स येथें तोटा जाणून पत्रीं विस्तार लिहिला. असे सरकारांत ऐवजाचा तोटा आहे, ह्मणून श्रीमंतांचे चित्त स्वस्थ नाहीं. तरी आपण श्रीमंतांची कृपा संपादून घेतीलच. परंतु, सूचनार्थ. सेवेसी लिहिलें असे. + बहुत काय लिहून. कृपालोभ असो दीजे. हे विनंति.