Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

येकूण पंधरा गांव इनाम. पे॥ कदीम देशमुखीस गांव आठ उभयतास करार करून दिल्हे. ठरावाप्रणें उभयतांचे वंशपरंपरा अज्ञाणे पदमसिंग पि॥ यास नूतन इनामी व कदीम दिल्हे आहेत. यास्तव याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरे चालवीत जाणें. सदरहू गांव इनाम दिल्हे आहेत, यामध्ये गड किले याकडे चालत होते, ते दूर करून यांस करार करून दिल्हे आहेत. एशी यास त्या गावीं गडकरी याची अर्धलीची शेतें असतील ती त्यांकडे चालविणें. सदरहू गाऊ इनाम यास दिल्हे असेत. ह्मणून याच्या माथा शेरणी पेशजी व नूतन, व र ॥ रामचंद्र पंडित अमात्य यांचे विद्यमान त्या खेरीज हल्ली रुपये १०,००० हजार ठेविली आहे. त्याचा वचन हुजूर होईल हे जाणून सदरहू गांव देविल्याप्रणें सुरळीत चालवीत जाणें. हुजूर न करणें कदीम इनाम गांव आठ पे॥ मौजें बोरगाव तैनात आहे. हल्लीं सूर्याराऊ पि॥ याकडे जातीस दिल्हे आहे ह्मणून राजश्री हाराजी श्यामराव नामनाथ सुभा प्रांत जावली याचे नांवे अलाहिदा सनद सादर केली आहे. या प्र॥ ते दुमाले करून चालवितील. वरकड गांव तुह्मीं चालवीत जाणें. या पत्राची तालिक बाराकडे; अस्सलपत्र भोगवटियास देशमुख म॥ निल्हे जवळ देणें. कसबे वाई पेशजी इनाम करून दिल्हा होता तो दूर केला असे. सदरहू कदीम गांव करार करून दिल्हे असे, याप्रणें चालविणें. जाणिजे. लेखनालंकार. मोर्तब.
सुद. रुजूसूद.
नक्कल.
शिका.