Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

चव्हाणाचा दावा जबरदस्त लागला. आठा दिवसांत एक युध्द ठेविलेंच आहे. तीर्थरूपांनीं पैलकडील मुलखाची स्वारीमुळें खराबी केली. चव्हाणाची जबरदस्ती ऐलकडे पडली. आपले बापाचें व चव्हाणाचें हमेशा युध्द होत गेलें. तेव्हां निळकंठराव यांचे बाप व चुलते चव्हाणापाशीं होते तें स्वारीस येत. त्यांजबरोबर हेही येत असतां महाराजापाशीं कोणी सांगणारानें सांगितलें, येसाजी थोरात याचे भाऊ चव्हाणाबरोबर आहेत, नवा लक्षांची दौलत- विजापूरदेश- त्यांजकडे आहे, तरी स्वामींनीं मोजे बहें व मोजे काखें हे दोन्हीं गांव त्यांचे पाटिलकीचे अमानत करावे. ऐसें सांगितलें. हा मजकूर दरबारी जाहला. शिदोजीबावास कळलेवर दरबारास जाऊन, रावप्रतिनिधि यांचे विद्यमानें पांच सात हजार रुपये खर्च करून वतनें राखिलीं. महाराजापाशीं रावप्रतिनिधींनीं सांगितलें कीं, शिदोजी थोरात यांचे पाटिलकीचे दोन गांव आहेत, ते महाराजांचे राज्यांत खस्त मेहनत करतात, तरी त्यांचीं वतनें आहेत त्यास हरकत करूं नये. मौजे कारवें येथील पाटीलकी वाघ्या बजाजी पाटील यांसी खासा शिदोजी थोरात यांनीं मारून आपलें वतन साधिलें हें नेमस्त आहे, ऐसें सांगोन दरबार खर्च करणें तो करोन वतनास खलेल न होय तें केलें. वतनें सुदामत चालूं लागलीं व सुदामत वतनवादे चालूं देत नव्हते त्यास वाद घालून वतन आपलें सुदामत केलें. तेव्हां निमेचे भाऊ होळीस पोळी बांधो देईनात. दुराई दिल्ही. कितेक वर्षें अमानत राहिले. राव प्रतिनिधि जिल्हा काढून पंत मंत्री यांचे स्वाधीन जिल्हा केला. तेव्हां शिदोजीबावाचे स्वाधीन हा मुलूख अवघा गेला. मग दोन तीन हजार स्वार ठेऊन चव्हाणाशीं टक्कर देऊन संभाजी महाराज यांचा मुलूख सत्यानास केला. महाराज कृपाळू जाहले. तेसमयीं होळीचे पोळीचा मजकूर केला. तेव्हां वादी यासी बोलावून आणवून थळास जाणें ह्मणून महाराजांनीं सांगितलें. तेव्हां थळास राजी नाहींत. देशमुखीचे मुतालीक यांस महाराजांनीं त्याची मुनसफी सांगितली जे, इनसाफ करणें अगर वतनास खलेल न करणें. नंतर तुकाजी वादी यासी व शिदोजीबावा यासी बोलाऊन होळीची पोळी लाविली. तेव्हां दरबार खर्च चार पांच हजार रुपये पडले. ऐसे वतनसंबंधें दहा पंधरा हजार रुपये पडले व दौलतसंबंधींही कर्ज ४०।५० हजार रुपये आंगावर पडले. हीं दोन्ही कलमें आपली यावीं, दौलत त्यांजकडे राहिली त्याचा विभाग यावा व बहेची पाटीलकीची तक्षीम यावी, व शेताचें दिवाणचें खंड वारिलें तेंही यावें. सदरहू आपले कज्जे याप्रमाणें आहेत. येसाजी थोरात याजकडे कदबा लिहून दिला. करीना साक्ष मोझेनिशी परवून देऊं.