पत्रांक ४०.

श्री
१६८८ भाद्रपद शुद्ध ५

सेवेसी गोविंद शिवराम व चिंतो अनंत कृतानेक सा नमस्कार विज्ञापना.

स्वामीची आज्ञा घेऊन निघालों तो मंगळवारीं संध्याकाळीं श्रीमंतांजवळ आलों. सर्व वर्तमान निवेदन केलें. त्यास, गुरुवारीं भेटावयाचा मुहूर्त पाहिला होता तो निवेदन केला. त्यास, येथील मर्जी कीं बुधवारी संध्याकाळींच भेट जाहली पाहिजे. येथील पंच्यांगीं गुरुवारीं दिनक्षय आहे. रेवती नक्षत्र श्रीमंतांचे घात नक्षत्र आहे. यास्तव बुधवारींच भेटावें हाच निश्चय केला पाहिजे. संध्याकाळपर्यंत सुमारें सत्वर यावें. फौज बराबरील सारीच आणावी, अशी येथील मर्जी आहे. जर फौज मागें ठेविली, तरी फौजेची वाट न पाहतां बुधवारीं संध्याकाळींच यावें. हत्ती अंबारिया आणाव्या. से. वेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries