[२५०]                                      ।। श्री ।।            २ सप्टेंबर १७६०.

विनंति उपरि. सविस्तर लिहिलेंच आहे. मींहि ताकीद केली आहे. वरचेवर चिरंजीव बाबापासून ताकीद करवून हिसेब आणवणें. करोलीकडे, याकडेहि ताकीद लिहून पाठविली. तुह्मींहि ताकीद करणें. आह्मीहि करितों. पंधरा रोजांत सर्व येतील आणि आह्मीहि इकडून फडशा करून येतों. आणि श्रीमंत रा॥ भाऊ स्वामीकडे जाऊन काय करावें ? मागील पुढील कजिये होते. डुडी होती. नाहीं तर आह्मीहि रोज भेटावयास श्रीमंत स्वामींस जातों. आतां तुह्मींहि मेहेनत केलीत आहे. त्यास पंधरा रोजांत सर्व फडशा होऊन येईल आणि गुंतेहि वारतील. सर्व निर्मळ होईल. वरचेवर लिहीत जाऊन. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.