[२३२] ।। श्री ।। २० आगष्ट १७६०.
पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो॥ यांसिः
विनंति उपरि. सादुल्लाखान वगैरे रोहिले यांचा पैगाम आहे कीं पार गंगेच्या उतरावयाची फौजेची तरतुद करावी. नावाडी सोरमचे घाटचा थुरिया आहे. त्यास आपण जावयाचें सांगतों. फौजा जातील, त्याणीं त्यास न्यावें. वस्त्रें देऊन उमेदवार करावें. नावा जमा कराव्या. ह्मणजे पुल बांधोन पार फौज उतरेल. याप्रें।। सोरमच्या घाटीं केलिया पारचे रोहिले वगैरे इकडे येणार नाहींत. तिकडील हंगामियामुळें गिलज्याच्या लष्करांत जे आहेत ते इतक्याच निमित्यें उठोन जातील. त्यास, सदर्हूप्रें।। तुह्मीं लिहिल्या घाटास येऊन, थुरिया नावाडी यास नेऊन, वस्त्रें देऊन, नावा जमा करून, पूल बांधोन, उतरावयाची तयारी करणें. र॥ छ ८ मोहरम हे विनंति.