Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

पण हा कायदा एकतर्फी नव्हता याचीही मांडणी राजवाड्यांनी केली आहे. "शूद्रानी सर्व दासकर्म आटोपल्यामुळे स्वास्थ्य व फुरसत मुबलक मिळून वैश्यांना व्यापारधंद्याकडे, क्षत्रियांना देशसंरक्षणाकडे व ब्राह्मणांना विद्यावृद्धीकडे लक्ष देण्यास सापडून राष्ट्रांची चोहोकडून भरभराट झाली. आफ्रिकन गुलाम मिळाल्यामुळे युरोपियन व अमेरिकन राष्ट्रांची गेल्या चारशे वर्षांत जशी अभूतपूर्व भरभराट व प्रगती झाली तशीच प्रगती उत्तर कुरूंतील आर्यांची शूद्रप्राप्तीने झाली. पुरुषसूक्तकार मोठ्या दिमाखाने व फुशारकीने सांगतो की विराटसंस्था स्थापन होऊन, चातुवर्ण्याची समाजपद्धत सुरू झाल्यापासून घोडे, गाई, शेळ्यामेंढ्या इत्यादि संपत्ती वाढून ऋक, यजुः, साम व अथर्व अशा चार वेदांचे उपबृंहण झाले आणि वैराज्य भोवतालील सर्व भूमी आक्रमून बसले.” ( राधामाधव. पान १४४-१४५ )

त्याच्या पुढचे विवेचन पुढे पाहू. प्रथमतः निसर्ग, उत्पादनाचे हत्यार व मनुष्य आणि यातून उत्पादन झालेली वस्तू ही केवळ त्या मनुष्यसमूहापुरतीच वापरली जाई. हत्यार व कौशल्य यांची वाढ होऊन गरजेपेक्षा उत्पादन करण्याची क्षमता येताच दुस-याकडून श्रम करून घेऊन, त्याच्या पोटापाण्यासाठी लागणारा हिस्सा ठेवून त्याच्यावरचा अतिरिक्त हिस्सा स्वतःचीच मालमत्ता करण्याची पद्धती निर्माण झाली. संभोगार्थ सामायिक उत्पादन अशी स्थिती होती तोपर्यंत वैश्य-शूद्र कर्म व त्यांच्याशी शरीरसंबंध व त्यांची प्रजा ही धर्मबाह्य नव्हती. तसेच त्यामध्ये बाह्य समाज येण्याची किंवा गुलामीसमान शूद्र जाती निर्माण होण्याची शक्यता नव्हती.

पण साधनांची व मनुष्यबलाची उत्पादक शक्ती वाढली तसे त्यामध्ये लढाईत किंवा इतर मार्गांनी सापडलेल्या टोळ्यांना आपल्या तंत्रांत किंवा वर्ण-जातिरचनेत आणून त्यांच्या वर "राज्ययंत्र-शक्ति" स्थापण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. समाजाच्या रचनेमध्ये जातिभेदांना केवळ कर्मभेदाचे जे स्वरूप होते व शूदीपासून ब्राह्मणाला झालेली मुले ही ब्राह्मणच समजली जात व शूद्रा-भार्यः असे ब्राह्मण कुटुंब असे ती पद्धत बंद पडली. नवी वर्ण व जातिसंस्था निर्माण झाली. जिच्यामध्ये पूर्वीचे नैसर्गिक व उपभोगहेतु-पूर्तीचे उत्पादनकार्यामधले वर्ण-जातिसंबंध शास्त्रशुद्ध समजले जात त्यात फरक घडला. त्याची सुरुवात शूद्रामध्ये दोन भाग करून झाली.

राधामाधवचे हे विवरण इतके इतिहासदृष्टया अमोल आहे की त्याचे मूल्यमापन व संपूर्ण फोड इथे करणे कठीण आहे.

येथून मात्र राजवाडे यांच्या आणि मार्क्सप्रणीत सिद्धान्तांची फोड निरनिराळ्या रीतीने करणे भाग पडते.