Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

ते शरभराजे, सार्वकाल हीं विभूतिरुद्राक्षालंकृतेंकडून, श्री सोमस्कंद मूर्तीची उपासनायुक्त राज्यपरिपालन करीत असतां, तेच सोमस्कंद मूर्ती स्वप्नांत प्रसन्न होऊन मन्त्रोपदेश केले । त्या मंत्राचे माहात्म्येकडून, दक्षिणप्रांतचे पादशहा संतोष पाऊन, बिर्दलीपूरास प्रतिनाम बिदलर हीं-शरभ राजास जाहागीर दिल्हे । उपरी, शरभ राजाचे उदरी महाशेन ह्मणून राजे जन्मले ॥ ३ ॥

त्या महाशेन राजानी, पन्नासहजार स्वारस्तोम घेऊन, हंबीर पादशाहास युद्धास कुमक केले । तदनंतरे त्या महाशेन राजानी, परमनीतीकडून राज्यपरिपालन करीत आल्या, पुण्यप्रभावेंकडून त्यांस पन्नास पुत्र जाहले। त्या पन्नास पुत्रापैकीं ज्येष्ठपुत्र एकशिवराजा म्हण्णार, राज्यधर वंशधर हीं झाले । त्या येकशिव राजानीं, श्री सांबशिवाची भक्ति विशेष केल्यामुळे, सांबशिव प्रत्यक्ष होऊन, या उपरी तुम्हांस व तुमचे वंशपरंपरेस हीं महाराज ह्मणून सकळ प्रपंचांतहिं प्रख्यात होईल, ह्मणून तेव्हांच, महाराज बिरुदें समग्र वागवणेस तुम्ही योग्य, करितां उत्तम बिरुदें समग्र वागवणें ह्मणून, आज्ञापिले । त्या श्री सांबशिवाचे आज्ञेकडून, महाराज येकशिवराजानी, स्वतेव इतर राजास जिंतून संपादिली बिरुदें कित्येक, व हंबीर पादशहानी येकशिवराजाचे वडील महाशेन राजानी, आपल्यास फार कामा आले, ते नव्हतां, येकशिवराजे हीं प्रख्यात होऊन बहुत शूरत्वेंकडून आपल्यास हीं फार वेळ कुमक करून स्थापिले; सांप्रत त्यांस श्रीसांबशिव प्रत्यक्ष होऊन सकळ बिरुदें वागवणेस आज्ञापिले; करितां, आपण हीं या येकशिव राजास आपली खांस बिरुदें कित्येक द्यावी, ह्मणून हत्तीची बिरुदें कित्येक, व घोड्याचीं कित्येक, इतर बिरुदें कित्येक, येणेंप्रमाणें दिले । तेव्हां त्या येकशिवमहाराजानीं, ते बिरुदें समग्र येकवटून आपल्या जवळील उत्तम सामादीक सर्वदा उत्तम काम करीत आले, त्यांस येकेक काम नेमिलें । त्याचा विस्तार थोडा जाणवितों :- जे मुख्य प्रधान पेशवे व