मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति. उपरि. उमरखेड बाबत प।। वसमत येथें चाळसा हजाराची तनखा मध्यस्तांनीं देविली. त्यापैकीं वीस हजाराची पावती तुह्मीं दिल्ही. त्यास त्या पावतींत चाळीस हजारपैकीं पैसा उधार मात्र नसावा.; ह्मणोन राजश्री नाना यांचे पत्रीं आज्ञा व सदरहूआन्वयें तपसिलें तुह्मींही लिहिलें. त्यास चाळींस हजाराचा उच्चार रसीदेंत न येतां प॥ उमरखेडचे ऐवजीं वीस हजार दिल्हे ते पावले या प्रो पहिल्यानें आह्मीं रसीद वसमतकरास द्यावयास लागलों, परंतु सदरहूप्रो रसीद घेईतात. त्यांचे ह्म ( ण ) णें कीं:- चाळीस हजाराची तनखा जाली त्यापक्षीं चाळिस हजारापौ वीस हजार पावले. ऐसा उध्धार रसीदींत आणोन रसीद द्याल तर घेऊं, याप्रों मोठा घोळ पडला. तेव्हां आपला दस्तऐवज न गुंते, आणि वसमतकराची समजूत निघे आशा त-हेची रसीद दिल्ही कीं:-- प॥ उमरखेड या महालापासोन शाहमिर्जानें ऐवज घेतला तो नवाबाचे सरकारांतून येणें त्या ऐवजीं वसमतेवर चाळीस हजाराची तनखा दिल्ही त्यापैकीं वीस हजार पावले. याप्र॥ रसीदींत लेख. तेव्हां शाहमिर्जानें उमरखेडचा ऐवज घेतला तो नवाबाकडून येणें त्या ऐवजीं चाळीस हजाराची तनखा ऐसें लिहिण्यांत, त्या अर्थी चाळीस हजारावर ठराव जाला ऐसा आर्थ कांहीं ससीदींत परिच्छिन्न निघत नाहीं. त्या ऐवजीं ऐसा शब्द, येणें करून जो शाहमिर्जानें नेला नसेल त्या ऐवजीं याप्र॥ स्पष्टार्थ आहे. वसमतकराची तर समजूत चाळीस हजाराचे तनखापैकीं वीस पावले हें लिहिल्यावरून जाली. आणि आपला तर चाळसावरच ठराव जाला, ऐसें नाहीं. पुढें बोलण्यास, जाबसालास जागा राखूनच रसीद सदरहू प्र॥ देण्यांत आली. तुह्मास सविस्तर समजावें सबब लिहिलें. असें नानास सांगितलें. नानांनीं मला आज्ञा केली कीं:-ठाणें तुम्हीं घेणें ऐसें गोविंदराव कसें बो ( ल ) ले ? मीं जाब दिल्हा कीं:- असी गोष्ट कसी घडेल ? हीं अक्षरें त्यांचे मुखावाटे निघणारच नाहींत. लक्ष्मीचंदानें आपले साधनाकरितां लाऊन लिं आहे. परंतु यांजकडोन असें घडणार नाहीं. याप्र॥ जालें, कचें समजावें ह्मणोन विनंति लि. मध्यस्तांसीं बोलोन गांवास उपसर्ग न होये आसें घडावें. तेजवंत यांसही सांगावेः-हें काम जाबसाली, यास लडाई वे मोर्चे कारण नाहीं. वाजबी जाबसालानें ठरेल तसें येका चिठीवर होण्याचें काम ! सध्यां उपसर्ग गांवास न लागे, आसें मध्यस्तांसीं बोलोन करावें, ह्मणोन लिं. त्यास, मौजे वाघोली हा गांव तेजवंत यांस जागीर जाल्या नंतर त्यांणीं आपल्याकडोन आनंदराव केशव वकील यांस आम्हांकडे पाठविलें कीं:-- हा गांव आम्हाकडे जागीर जाला नाहीं. आपण आपलें। पत्र द्यावें. ते समंई आह्मीं यास उत्तर साफ दिलें कीं:--हा गांव सरकारचा याचें नांव तुम्हीं न घ्यावें, कदाचित गांवास उपसर्ग कराल तर परिणाम लागणार नाहीं, आम्हांसही मध्यस्तासीं बोलावें लागेल हें कामें जाबसा-