Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

१ अप्पासाहेब व परशरामभाऊ पुण्याहून निघोन गेले. नंतर तेच वेळेस त्रिंबकराव नारायण परचुरे कोथरूडचे बागेंत होते त्याणीं येऊन पुण्याचा बैदोबस्त केला. बहिरोपंत मेंहदळे सापडले त्याची बेहुरमत केलीं, त्यास व त्यांचे पुत्र अन्याबा यांस धरून कैद केले वे परशरामभाऊ यांजकडील लोकांस धराधर फार केली, कैदेंत ठेविलें, त्यांची घरें लुटून सरकारांत आणिलीं; शहर हावालदील जालें.

१ श्रीमंत बाजीरावसाहेब हिंदुस्थानांत रवाना केले, ते केसो गोविंद यांचे बेलापुरापर्यंत गेले होते, त्यांस शिंद्यानें आपले लष्करांत माघारें आणिलें. येते समंई कोरेगांवचे मुक्कामीं बाजीराव साहेब छ, १४ जमादिलावली येऊन तेथून नाना फडणीस यांस चिठ्ठी पाठविली. तिची नक्कल राबिसन साहेब यांचे कागदांत सापडली. त्यांतील मजकूर कीं आमची स्वारी कोरगावांस आली, तुमचे येणें न जालें त्यांस पुण्यानजीक येऊन राजश्री दवलतराव शिंदे, अलीजा बाहादूर व अजमल उमराव बाहादूर यांसुद्धा भेटीस येणें. दुसरें सरकारचें हिताकारतां तुमचे वचन ज्याशीं गुंतलें असेल तें वचन सरकारचें गुतलें. खातरजमेनें लौकर यावें. आपले विच्याराखेरीज कांहींएक घडावयाचे नाहीं. याप्रमाणें चिठ्ठी पाठविली.

१ अमृतरावसाहेब पुण्यास आणिलें.

१ बाबा फडके चाकणेस होते ते पुण्यास आले.

१ श्रीमंत बाजीरावसाहेब, चिमणाजी अप्पा. अमृतराव साहेब यांच्या भेटी मुंढव्याचे मुक्कामीं जाल्या. कार्तक वद्य ७ सोमवार छ, २० जमादिलावेल.

१ नाना फडणीस यांशीं शिंदे अनकूळ जाल्यामुळें त्यांचें राजकारण सिद्ध झाले. व बाजीरावसाहेब यांची चिठ्ठी गेल्यावरून नाना फडणीस जलदीनें माहाडाहून निघोन पुण्यालगत यरंडवणे येथे येऊन मुक्कामास आले. बाजीरावसाहेब यांचा भरवसा नाहीं, याजकारितां मशीनमुलुख यांस दरम्यान घेऊन नवाई यास बाजीरावसाहेब याची चिठ्ठी देविली; त्याचा मसुदा राबीसन साहेब यांजवळचे कागदांत सांपडला. त्यांतील मजकूर कीं बाळाजी जनार्दन फडणीस यांस आम्हाकडून त्यांचे ज्यानास व हुर्मतीस अपकार होईल येविशीं. त्यांस संशय; यास्तव मशारनिल्हेची खातरजमा आह्मीं आपल्याकडून करविली त्याप्रमाणें आपण केली. त्यांस बाळाजी जनार्दन यांजकडून आमचे जातीस व दौलतीस व पंत प्रधानीस व खावंदगिरीस व तेज्यास सबाह्य अंतर वाकडे होऊं नये. पंत ---आम्हाजवळ असेल अथवा सोईस न पडल्यास स्नानसंध्येस नेमाप्रमाणें निरोप दिल्हा जाईल. त्यांचे ज्यानास व मालास व हुर्मतीस सबाह्य वाकडे होणार नाहीं व चित्तांत येणार नाहीं. त्याजवरून नानाची खातरजमा होऊन कारभार त्यांचे विच्यारें होऊं लागला.