Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२४०]                                                                               श्री.                                                                          

विज्ञापना ऐसीजे:- राजश्री रघोत्तमराव यांस नवाबांनी पाठविले. त्यांनीं नवाबाचा निरोप सांगितला कीं, इंग्रजी पलटणें व पागावाले या जमयतीस बोलावून रायचूरचे बंदोबस्तासाठीं पाठवावयाचें, असद अल्लीखान यांची व मुसारेमूची जमीयत अलीज्याह यांचे पाठलागास जावी, याप्रमाणें ठरलें, त्यास आपण व असदअल्लीखान मिळोन रेणापूरपर्यंत जावें. तेथून मुसारेमू व असदअल्लीखान पुढें जातील. मीर अल्लम बहादूर यांस घेऊन तुह्मीं श्रीमंतांकडे जावें, यास दिवसगत लागूं नये. आपली तयारी करावी, याचें उत्तर लवकर कळावें. याप्रमाणें मशारनिले यांनीं बयान करून सांगितलें. याचें उत्तर त्यांजबरोबर सांगून पाठविलें कीं, आज्ञेस उजूर नाहीं, मीर अलम यास बोलावून आणावें, त्यांची आमची एकवाक्यता करावी, कितेक निश्चयांचे पर्याय त्यांस व आह्मांस समक्ष सांगावे, ह्मणजे मीर अलम दिक्कत घेणार नाहींत, नाहीं तर थोडक्यासाठी दिक्कती घेऊं लागतील, थोरल्या कामास दिक्कतीखालें लांबणीवर पडावें हा सलाह नाहीं, त्यांसही कांहीं निश्चय पुसून घ्यावयाचे असतील त्याचा अर्ज करतील, सलाहनेक असेल त्याची आपण आज्ञा करावी, हें होत आहे तोंपावेतों. मी श्रीमंतास लिहून आज्ञा आणवितों, मग निरोप घेऊन जाईन. याप्रमाणें रघोत्तमराव जाऊन नवाबाशीं बोलिले. त्याजवर मागती मशारनिले याजबराबर सांगून पाठविलें कीं, मीर अलम यांस येथें बोलावून नंतर रवानगी करणें, अथवा तुमचा जाब श्रीमंतांकडून येणें यास दिवसगत लागेल. तुह्मीं ते पुण्यास जाऊन, बोलणें होऊन, जाबसाल होणें. नंतर श्रीमंतांच्या आमच्या भेटी. यास लांबण पडेल. उष्णकाळ हंगाम होतो. याजकरितां लांबणीवर तुह्मीं टाकूं नये. तुह्मीं जाबाची इंतजारी केलीत तर दिवस मात्र लागतील, या ह्मणोन उत्तर येईल, कदाचित् येण्याचें कारण नाहीं, तेथेंच निश्चय ठरवून आह्मीं लिहूं तेव्हां यावें, ऐसें श्रीमंतांनीं तुह्मांस लिहिलें असतां, आमची समजूत पडणार नाहीं. तुह्मीं, मीर अलम जाऊन ठराव केलियाखेरीज कांहींच व्हावयाचें नाहीं. शेवटीं जाणेंच लागेल. आतां आह्मीं जावयासी सांगितलें असतां गेला नाहीं. लांबणीवर तुह्मीं टाकिलें, एवढा मात्र शब्द राहील. याजकरितां जाब येण्याची प्रतीक्षा करूं नये, मीर अलम यांस येथें बोलावण्याचें प्रयोजन नाहीं. ते माहीत आहेत. रघोत्तमराव तुमचेबरोबरच आहेत. हे वाकीफ जातेवेळेस तुह्मांसी सर्व बोलण्यांत येईल. आतां लांबणीवर टाकणें दौलतखाहीस लाजम नाहीं. आह्मीं आग्रहानें जा ह्मणतों, तेव्हां श्रीमंतही तुह्मांवर शब्द ठेवणार नाहींत. याप्रमाणें तकरार करून सांगून पाठविलें. परवानगी आलियाशिवाय जात नाहीं ऐसें ह्मणावें, तर बेमर्जी होते. बेमर्जी जाली तर होऊ, परंतु परवानगी आलियाशिवाय जावयाचें मान्य करूं नये. यांत कांहीं सरकारकिफायत आहे ऐसें असलियास नीट. यांचे मर्जीशीं दरकार नाहीं, तोही प्रकार दिसत नाहीं. यांचे मनांत असें आलें आहे कीं, श्रीमंतांशीं रदबदल केली असतां मान्य करतील. तो विधि स्वामीजवळ बयान करावा, आज्ञा होईल त्याप्रमाणें सांगावें, हें जालियावेगळ भाग उठत नाहीं. तेव्हां नवाबाची बेमर्जी करून न यावें, यांत सरकार किफायतीचेंही कांहीं दृष्टीस पडेना. मग यांची उगीच बेमर्जी करणें यांत सलाह न पाहिली. सांगून पाठविलें कीं, खाविंदी आणि ताबेदारीचा प्रकार, जसे श्रीमंत तसेच आपण, उभय दौलतीस नेक, आणि मजवर इलजाम नाहीं ऐसें समजोन आज्ञा होईल त्यास हजर. याप्रमाणें सांगून पाठविलें. नंतर जबाब आला जे, आह्मीं समजोन सांगतों, विलंब न करतां लवकर दो चहूं दिवसांत निघावयाचें करावें, हीच सलाह. किस्तीशिवाय कलमांचे फडचे व्हावयाचे ते अद्याप जाले नाहींत. राजाजीस सांगोन करून देवावे ह्मणजे. लवकरच रुकसत घेईन, ऐसे रघोत्तमराव यांस बोलावयासी सांगितलें. त्याजवरून राजे रेणूराव यांस आज्ञा जाली कीं, कामें उलगडून घ्यावीं. त्यास वास्तव रवानगी आज्ञा रेणूराव यास केली असेल त्याप्रमाणें तेंही जाबसाल उलगडतील. काय कामें करून देतील तीं करून घेऊन, मीर अलम यांस घेऊन, सेवेसी येतों. र॥ छ १६ रबिलाखर. हे विज्ञापना.