Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

प्रतापसिंह राज्यावर बसल्यानंतर थोड्याच दिवसांत नागपूरचे रघुजी-- भोंसले यांनीं सातारच्या राजाचें सैन्य घेऊन दक्षिण हिंदुस्थानांत दुस-- स्वारी केली. सातारकरांनीं या वेळपर्यंत ज्या मोठमोठ्या मोहिमा केल्या- त्यापैकींच ही एक होय. तंजावर येथील मराठे परस्पर मत्सरभा-- विसरले असते व त्रिचनापल्ली येथें जय मिळाल्यानंतर लढाईचें काम रघोजी भोंसल्यानें तसेंच पुढें चालविलें असतें, तर या मराठा सैन्यानें जो जय मिळविला तो शाश्वत झाला असता. परंतु त्रिचनापल्ली येथें एक सैन्याची तुकडी ठेवून व चंदासाहेबास पकडून रघूजी भोंसले साता-यास परतले. याच सुमारास उत्तर हिंदुस्थानांतील मोंगलांच्या सत्तारूपी वृक्षाच्या मुळाशीं कुहाडीचा घांव घालून तो वृक्ष उलथून टाकावा याबद्दल पेशव्यांची खटपट चालूं होती. इकडे उत्तरहिंदुस्थान तसेंच सोडून दक्षिणहिंदुस्थान कायमचें काबीन करावें, अशी मसलत कित्येक मराठा सरदारांनीं शाहूस दिलीं, व या मसलतीस अनुसरूनच रघोजी भोंसल्यानें दक्षिणेंत स्वारी केली होती. या स्वारीहून परत आल्यानंतर बंगाल्यांत व पूर्व हिंदुस्थानांत रघोजी भोंसला गुंतला, व दक्षिणेकडे हैदरअलीचा उदय होईपर्यंत मराठ्यांची सत्ता अगदीं नाहींशी झाली. पाँडेचरी येथील फ्रेंच गव्हरनर डुप्ले याचे सांगण्यावरून शाहूनें चंदासाहेबास अटकेंतून मुक्त केलें. यामुळें इंग्लिश व फ्रेंच यांमध्यें लढाई सुरू होऊन ती इ. स. १७५० पासून इ. स. १७६० पर्यंत चालली. तंजावरचे राजांनीं इंग्लिशांचा आश्रित महमदअल्ली याचा पक्ष धरिला. म्हणून फ्रेंचांचा स्नेही मुरारराव घोरपडे यानें त्यांचें फार नुकसान केलें. इंग्लिशांना तंजावरच्या राजास मदत करितां येणें शक्य नाहीं अशी संधि गांठून मुराररावानें तंजावर शहर लुटून फस्त केलें. पुढें फ्रेंच जनरल लाली यानें तंजावर लुटण्यास सुरुवात केली; परंतु या प्रसंगीं इंग्लिशांनीं मदत पाठविली. या कर्नाटकांतील लढायांत माणकोजीच्या हाताखालील तंजावर येथील फौजेनें इंग्लिशांचीं बाजू धरून फ्रेंचाविरुद्ध लढाई चालविली व मोठें नांव गाजविलें.

तंजावरच्या राजांनीं इंग्लिशांची बाजू घेतल्यामुळें आपलें इतकें नुकसान विरून घेतलें तरी, त्यास आलेला शह अजून नाहींसा झाला नाहीं. तंजा--र येथें संपत्ति फार आहे अशी ख्याति असल्यामुळें, नवाब महमदअल्ली --चा तंजावरावर डोळा होता. तो कांहीं तरी निमित्त काढून तंजावरच्या राजाबरोबर तंटा उपस्थित करी. शेवटी इ० स० १७६२ मध्यें इंग्लिशांच्या मध्यस्थीनें तंटा मिटला. त्यांत तंजावरचा राजा नावाबाचा मांडलीक आहे, त्यानें नावाबास चार लाख रुपये खंडणी द्यावी व इंग्लिशांनीं जामीन रहावें असें ठरलें. पुढें इ० स० १७७१ मध्यें - नवाबानें मद्रासेंतील इंग्लिशांची मदत घेऊन प्रतापसिंहाचा मुलगा तुळसाजी याजवर हल्ला केला. तुळसाजीस तह करणें भाग पडलें. या तहानें तुळसाजीला व त्याच्या संस्थानालाही अत्यंत कर्ज होऊन तंजावरच्या उत्पन्नाच्या पुष्कळ बाबीही कमी झाल्या. ह्या दुस-या तहांत तंजावरच्या राजाचे सर्व हितसंबंधांचा महमदअल्ली व त्याचे इंग्लिश सावकार यांच्या लोभास बळी द्यावे लागले. हे सावकार सांगतील त्याप्रमाणें मद्राससरकार चालत असे. इंग्रजांनी दिलेलीं वचनें पाळलीं पाहिजेत असा निर्बंध राहिला नाहीं. तंजावरचें राज्य तेथील राजाकडेच चालावें अशाबद्दल इंग्लिशांनीं जी हमी घेतली होती तीस त्यांनीं धाब्यावर बसविलें. इ० स० १७७३ त इंग्लिशांची मदत घेऊन महमदअल्लीनें पुनः लुटालूट करण्यास आरंभ के-- राजास कैद केलें, त्याचें शहर काबीज करून घेतलें व सर्व प्रांत नवाब-- खालसा करून आपल्या राज्यास जोडिला. हे लुटालुटीचे व विश्वासघाताचे-- प्रकार मद्रास सरकारानें आपल्या जबाबदारीवर व महमदल्लीच्या इंग्रि--- सावकारांचे फायद्यासाठीं सुरू केले होते. कोर्ट ऑफ् डायरेक्टर यांना या गोष्टीची मुळींच बातमी नव्हती. परंतु त्यांना जेव्हां वरील अन्यायाची सर्व हकीकत समजली, तेव्हां त्यांनीं मद्रास सरकारचा असल्या वर्तणुकीबद्दल फार निषेध केला. मद्रासच्या गव्हरनरास परत बोलाविलें व तुळसाजीस गादीवर बसविण्याचा त्यांनीं निश्चय केला; व तसे हुकूम सोडिले. त्या हुकुमांचा अंमल इ० स० १७७६ त झाला. तंजावर संस्थान नवाबाकडे तीनच वर्षे होतें, परंतु या तीन वर्षांत त्याने 'त्या प्रांतांची इतकी धुळधाण करून टाकली कीं, पुर्वीचें वैभव अल्पांशा--- प्राप्त होण्यास पुरीं दहा वर्षे लागलीं. याच सुमारास इंग्लिश व है---अल्ली यांच्यामध्यें लढाई सुरूं झाली, व इ० स० १७८२ आपल्या लुटारू फौजेकरवीं ह्या हतभागी तंजावर संस्थानचा उ-- करून हैदरानें आपला सूड उगविला. हीं सर्व संकटें अ-- असतांच, अकरा वर्षें राज्य करून तुळसाजी मृत्यु पावला. तंजा-- बालकाचा महाराष्ट्रमातेपासून वियोग झालाच होता. इंग्लिश व है--- अल्ली यांच्या कचाट्यांत तंजावर सापडलें होतेंच. त्याला मराठ्यांच--- स्वा-यापासून किंवा हैदरावर मिळविलेल्या जयापासून कांहींच म-- झाली नाही. ह्या वीस वर्षांत त्याची भयंकर दुर्दशा उडाली व --- लढाईत पडल्यानंतर दक्षिण हिंदुस्थानांत जरी शांतता झाली, तरी तंजाव-- कुदशा कधीं संपली नाहीं. बुडत्याचा पाय खोलांत म्हणतात त्याप्-- एक चकमक झडली. त्यांत धोंडोपंतास धोंडीनें ठार केलें. त्यावेळेस तेथें बापू गोखले ही होते. बापूससुद्धां थोडीशी दुखापत झाली. तेव्हां चुलत्याचा बचाव बापूंना करितां आला नाहीं. धोंडोपंत ठार झाल्यावर त्याच ठिकाणीं बापू गोखल्यानें त्यांचें दहन केलें, व पुढील क्रियाकर्मांतर जातिधर्मनियमाप्रमाणें पुण्यास येऊन करावें ह्मणून ते घरीं आले. परंतु धोंडपंताची चुलती त्याला घरांत येऊं देईना. तिनें बापूची अतिशय निर्भर्त्सना केली व आपल्या यजमानास ज्यानें ठार केलें, त्या धोंडी वाघावर सूड उगवेपर्येंत कोणतेंही और्ध्वदेहिक कृत्य करावयाचें नाहीं अशी बापूस ( आपल्या पुतण्यास ) तिनें ताकीद केली. अर्थात्च उत्तरक्रिया करण्याचें बंद झालें. पुढें लवकरच प्रसंग साधून बापू गोखल्यानें धोंडी वाघास गांवून त्यास ठार मारिलें व त्याचें शिर आपल्या भाल्यास लटकाऊन तें लक्ष्मीबाईस ( म्हणजे धोंडोपंताचे पत्नीस ) दाखविलें. तेव्हा त्या बाईचा क्रोधाग्नि शांत झाला व नंतर बंद केलेली उत्तरक्रिया संपविण्यांत आली.