Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक २८९                                                                          श्रीनरहरीप्रसन

राजाश्रिया विराजित राजमान्य राजश्री दिनकर रावजी भाऊ स्वामीचे शेवेसी

पोष्य सदासिव नायक सरदेसाई कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ ५ जिलकाद पर्यत श्री            कृपेकरून वर्तमान यथास्थित असे विशेष आपणाकडून पत्र येऊन कुशलार्थ कलत नाही तरी ऐसे नसावे निरंतर पत्री संतोषवीत असावे यानंतर कसबा संगमेस्वर येथे आमचा वडिलोपार्जित वाडा आहे त्याजवरील वरपल होते ते जळाले त्याआलीकडे लाकडी काम वाड्यावरी करून शाकारणी नहुती त्यास गुदस्ता एक सोपा बांधावयाचा उद्योग आरंभिला तेव्हा हा राजवाडा ऐसे सरकारात समजाविले त्यावरून आह्मीं सेख ताडेकर याजबरोबर पत्रे देऊन पुणेयासि तुह्माकडे व राजश्री बापूरावजी व वेदमूर्ति राजश्री बालभट हर्शे पुणेयासि गेले ते समई आह्मी वाड्याचा मजकूर श्रीमंताच्या कानावरि घालून घर बांधावयाविसी आज्ञा देऊन पाठवावी ऐसे सांगीतले होते त्यावरून त्याणी वेदमूर्ती राजश्री सदासिवभटजी नानल याजकडून श्रीमंताचे कानावरी घालून राजश्री माहादाजीपंत काले निसबत सरसुभा याणी परवानगी सांगीतली जे हजार रुपयांचा कतबा सरदेसाईयाणी आपला वाडा ह्मणोन त्याजपासून घ्यावा आणि चौकसी करून वाडा बांधावयासी परवानगी त्यास द्यावी याप्रो। जाली आहे ह्मणोन आपले लिहिले आले नंतर राजश्री परशुरामपतदादा याणी आह्मास बलाऊन नेऊन हजार रुपयाचा कतबा मागितला तेव्हा आमचा वादी कोण ह्मणोन त्यास पुसिले तेव्हां त्याणी उतर केले की सरकारातून चौकसी करावी ह्मणोन आज्ञा जाली आहे त्यावरून चौकसी करितो तेव्हा आमचा वाडा वतनी श्रीमत कैलासवासी सभाजी माहाराज किले रायगडाहून मोगलाचे अडचणीमुर्ले कबजीचे बुध्दीने जरोर निधोन संगमेस्वरी आले ते उन्हाळा जमात वाड्यानजीक होते पर्ज्यन्यकाल आला चहूकडे धामधूक ऐसी संधी पडिली त्यात आमचा वाडा मोठा पाहून आमचे वडीलयाजवल जाग मागोन वाड्यात येऊन अडीच (महिने) पर्यत राहिले पुढे शेख निज्याम सुभा मोगल कडून येऊन त्याणे हस्तगत करून नेलें ते समई वाडा आमचा जालिला व गावातील ढेवले फोडिली व देव बाटविले याप्रो। माहार्णव जाहाले मोगलाने प्रात काबीज केला कसब्यात गढी बांधिली प्रातास कौल दिल्हा तेव्हा आमचे वडील रगोबा नायक याणी वाडा बांधोन वस्ती केली वीस पंचवीस वर्षे नांदले त्याजवर त्याचा काळ जाहाला त्याचे पुत्र पाच वडील केशव नायक व गणोबा नायक व विसोबा नायक दादोबा नायक व अंतोवा नायक ऐसे नांदत असता नारायणराव घोरपडे कानोजी आंगरे यांजकडे सुवर्णदुर्गास हबशीयाणे शह दिल्हा तो उठवावा ह्मणोन कैलासवासी अमात्यपत याणी पाठविले होते