Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ३.

श्री.
१५३० आषाढ शुध्द २
नकल

महजर बतारीख १ माहे रबिलाखर बिहजूर हकीमशरा व नैब गैबत हाजीर मजालसी प्रा। पुणें
मजालसी प्रा। पुणें

काजी आबन हकीमशरा
व काजी इसमाईल शरा
सेख नूरमहमद मुतवली
रोजा मखदूम सेख सला
कृष्णाजी त्रिमल मुश्रीफ
मालोजी नरसिंगराऊ
सितोले देसमुख प्रा। मजकूर
* * बिन * *
सेट सेटिया क॥ पुणे
व गोपालबा वेव्हारा माहाजन
रंगसेट सेटिया पेंठ मूर्तजाबाद
मीर सैद इसीफ नैब
गैबत किले कोंढाणा
व हवाले प्रा। पुणे
विठल कोनेर मजूमदार
 हिरोजी पंडित नाजीर
तुकपाटिल बिन चितपाटिल क॥ पुणे
बापसेट बिन जोमसेट
सेटिया व कृष्णाजी
 मुदगल व विष्णूबा
माहाजन पेटा शाहापूर
तानसेट सेटिया पेठ मलकापूर
इसम नाईकवाडी
कान्होजी बाबर
एकबोजी कानडा
नरसपाटिल बिन हेमपाटिल
मोकदम मौजे धायरी
धाऊजी जाघला
नामाजी सितोला हाली
मोकदम मौजे हडपसर
देऊजी पाटिल मोकदम
मौजे नर्‍हे
X X व बाबाजी मोकदम
मौजे आंबेगाऊ बु॥
काऊ पाटिल मोकदम
माजे उरली बु॥
गोमाजी मोकदम व गुंडाजी
मोकदम मौजे मांजरी बु॥
एस पाटिल मोकदम
मौजे पर्वती
लखमोजी मोकदम मौजे
लोणी कालभोर
दतजी व परसोजी
मोकदम मौजे गराडे
बाऊजी मोकदम मौजे भिवरी
बाजी मोकदम मौजे चांबिली
बाजी दरेकर मोकदम
मौजे आंबिले

बाजी मोकदम मौजे पिसार्वे

संताजी व बोपाजी
मोकदम मौजे पारगाऊ
नजीक पिसार्वे

 तुकपाटिल मोकदम
 मौजे राजेवाडी

सुलतानजी मोकदम
मौजे साकुर्डे
 नरसोजी मोकदम
मौजे जेजूरी
नाईकजी मोकदम
मौजे सोनोरी
कुमाजी मोकदम
मौजे वाल्हे
राघपाटिल मोकदम
मौजे हिंगणे बु॥
मोकदम मौजे खानवड
 हिरोजी मेहत्रिया लोहार

सु॥ सन तिसा अलफ कारणे महजर ऐसा जे वणपुरीचा पाटिलकीचा वेव्हार

अग्रवादी तान पाटिल बिन अचलपाटिल
कुंभारकर तकरीर केली ऐसी जे मौजे
मजकूरची पाटिलकी मिरासी आपले
वडील खात असता बावजी प॥ खांडगे
यांचा वडील कोतनाक खालिले देसीहून
वरता जात होता तो माहारी आपले
शेतामधे सरकती दिधली खोतनाक
सरकती करून गावी राहिला सेतांत
लावला यावरी माहारासी सेताबदल भांडो
लागला यावरी आपलिया वडिली हाकिलें
हाकितां त्यांसीं बोलो लागले जे पाटिलकी
आपली मिरासी ह्मणउनु आपलिया
वडिलासी करकशा करू लागले यावर
आपले वडील व जाऊ पाटिलाचे वडील
भांडत भांडत ठाणियास आले. ठाणा
मनास आणून हरएक मनसुफी निवाडा
करून खांडगे खोटे जाले आपलिया
वडिलांस महजर दिधला गांवास आले
गांवातून खांडगे बाहेर पडोन आपला
वडील पाटिलकी नागोजी करीत होता
तो मारिला व गाव मारून घेऊन गेले
निवाडा करून आपल्या वडिला महजर
करून दिल्हा होता तो वाण + जीचे
कारकीर्दीस गेला एक दोन निवाडे होऊन
मागती खांडगे करकशा करिताती तर
पाटिलकी मिरासी आपली पिढी दर पिढी
आपले वडील वडील खात आली ऐसा
रवा करीन खरा जालो तर खाईन खोटा
जालों तर लेकुराचे लेकुरि तुटलों

पस्वमवादी जाव पाटिल बिन बाद पाटिल
खांडगे तकरीर केली ऐसी जे मौजे मजकुरी
कुल खराब होते यावरी आपला पणजा
कोत पाटिल खालिलेकडून एतां गावी
राहिला होता गोवीचे मोकासाई आपला
पणजा यास बोलिले जे गांव खोर पडिला
सदाब पडिला आहे तुह्मास पाटिलकी
मिरास करून देऊं गांव मामूर करणे
ह्मणऊन आपलिया पणज्यास आणून
ठाणाचा व आपला कौल दिल्हा पाटिलकी
मिरासी करून दिधली आपलिया पणजा
याणे गाव मामूर केला यावर कुंभारकर
कुंभारवलणीहून आपल्या पणज्यासी
कुंभारकर करकशा करूं लागले. आपल्या
वडिलास ठाणा घालून नागविले आपण
तुटलों मोडलों परागंदा जालों मागें नागोजी
कुंभारकर मारिला ते तागाईत आपणासी
कुंभारकरांस भांडण लागले आहे आपण
व अचल पाटिल कुंभारकर भांडतां भांडतां
गोतामधें मौजे खलदास गेलों अचलपाटिल
बोलिला खरा होईल तो खाईल खोटा होईल
तो जाईल ह्मणऊन नेम केला आहे हाली
तान पाटिलानें रवा करीन ह्मणोन नेम
केला आहे तर तानपाटिल रवा करील
आपण साउली करीन खरा जालों तर
खाईन खोटा जालों तर लेकुराचे लेकुरी
तुटलों हे तकदीर सही