Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ८.

''फर्मान बमय मुनशरफ सदुरयाफत के विठोजी हैबतराऊ देसाई किले मुरंबगड आंके अज शहूर सन सी व अलिफ दरीविला सैद अबदुला बिन सैद महदम देसाई किले रोहिडे बदरगाह ज्याहापनाह इलतमास केली कीं मुलक निजामशाह व बाजे विलायत सिवा मलाऊननामे आपल्या दरकबजेंत आणून दस्त दराजी करितो, तर आपण मिरासदार कदीमी नजर येनायत फर्माउनि इनामात व दस्तु देसाई मा।रास सरफराज करून कोल येनायत फर्माविला पाहिजे कीं जमियत शायस्ता पैदा करून सिवा मलउंनाने मुलक काबीज केला आहे तो दर कबज पातशाहजीच्या आणिल त्यावरून खातील सुबारकेस आणौन इनाम वगैरा दस्तुर बित॥ जे

मौजे तांभारे १                      मौजे जांबली १                मौजे हाटवे १
मौजे मोहरी  १                     वगैरे

व बाजे किले मजकूर बमोजीब कबिला अवलाद व अफलाद मोकरर मरहमत फर्माउनु कौल दिधला आहे, तरी हरभांतेनें खातीरजमा जाणौन कितेक जमियत पैदा करून विलायत जे कांही मलाऊन कबज केली आहे ते दर कबज बुलंद दौलतीचे आणून दाखवणे. दौलतख्वाही व नेकखिदमती करून दाखवणे व बादज दौलख्वाही पुरापुर हाल बआ इस्तकामत मरहमत करून सरफराज फर्माविले जाईल. दरीं बाब कौल असे. ता। आबाद बरहुकम फर्मान अशरफ अकदस बमय मून अली रवद. तेरीख अल मजकूर दुयम शहर जमादिलौवल सन १५.

लेखांक ९.

श्री.
तालिक १५७२.

'' अज रख्तखाने राजश्री सिवाजीराजे दामदौलतहू बजानेबू कारकुनानी हाल व इस्तकबाल ता। गुंजनमावल बिदानद सु॥ इहिदे खमसैन अलफ बापूजी हैबतराव व हाबाजी व बाळाजी नाईक सिलींबकर देशमुख ता। मा। हे गलबल्यामध्यें आपले जमेतीनसी साहेबाचे मसलतेस येऊन एकतारी केली, त्यावरून देशमुखावर मेहरबान होऊन आजरामर्‍हामती इनाम मोजे चिचले बु॥ देहे १ एक आज मोजा तक्षीमा ३ तीन तपसिल

बापूजी हैबतराव                      हाबाजी हैबतराव           बाळाजी नाईक
तक्षिम १                                 तक्षिम १                    तक्षिम १

खेरीज नख्तयाती व महसूल व बाजे बाब कुलबाब इनाम दिधले. असे दुमाले करणे. अवलाद व अफलाद चालविणे. दर हर साल ताज्या खुर्दखताचा उजूर न करणें तालिक घेऊन असली खुर्दखत देसमुखापासी फिराऊन देणे सदरहू देह रकम नख्त टके १६६६४ व ऐन जिनस तूप ६६४ व ताग वजन ६१२॥ एकूण मख्ता खेरीज टके १६० एकसे साठी दिधले. असे दुमाला करणें मोर्तब असे.''

शके १५७२ विकृतीनाम संवत्सरे सन १०५१.