Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

याउपरि चैत्र व || १ पत्रे पाहिली. त्याजवर नित्य उठोन हरि सिध्देश्र्वर रा त्रिंबकपंत यास नमस्कार करून होते. मध्ये आठ दहा दिवस गेले. तो वद्य १४ रोजी प्राथःकाली वेदशास्त्रसंपन्न राजश्री केसोभटजीकडे वेदशास्त्रसंपन्न शास्त्रीबाबांनी घासीराम चोपदार पाठविला आणि सांगितले की, वेदशास्त्रसंपन्न रा पाठकजीबाबास चासकरांचे वर्तमान सांगून पाठविले आहे, त्यांजकडे चासकरांचा कारकून पत्र घेऊन पाठविणे, व तुम्हीही जाऊन त्यास वर्तमान समजावणे. त्याजवर भटजींनी चोपदारास सांगितले की, उत्तम आहे कारकून बसले आहेत तुमचे समक्षच त्यास सांगून पाठकजीकडे पाठवितो, पत्रे समजावितील, उपरांतिक आमचेही जाणे झाले तरी जाऊ. त्याजवर हरि सिध्देश्र्वर पाठकजीबाबांचे घरास भटजीचे सांगितल्यावरून कागद घेऊन गेले. भेट घेतली, शास्त्रीबाबांनी आपल्याकडे पत्रे व वर्तमान समजावयाविषयी आज्ञा केली आहे, त्यास मी आलो आहे. त्याजवर पाठकजीबाबांनी उत्तर केले की, आम्ही पत्रे काय समजावी, पंचाईत कोणाची करीत नाही, पंचाईत होऊन ठरावून येईल आणि पोथी पहावयास सांगतील त्याप्रमाणे पोथी मात्र पहावी. त्यास हरि सिध्देश्र्वर यांनी विनंति केली की, आमचाही वाद सांगणे नाही. आपण सिध्द आणि सुज्ञ आहा, आपणांस वर्तमान, पत्रे समजवावी इतकेच आहे. त्याजवर आज्ञा केली की, तिसरा प्रहरा येऊन पत्रे दाखवणे. त्याप्रमाणे तिसरा प्रहरा पत्रे घेऊन गेलो. तेथे वे || रा केसोभटजीही गेले होते. त्यांचे समक्ष पत्रे तपशीलवार वाचून दाखविली. वर्तमानही मातुश्रीचे आज्ञेप्रमाणे सांगितले. इतके दिवस वाद कोणाशी आम्हीही सांगितला नाही. जे देणे आहे ते सर्व श्रीमंतांचे आहे, त्यांचे विचारास येईल ते खरे, परंतु वाद सर्वथा घालणे नाही, कारण मी पूर्ववृत्तांस माहीतगार घरचा पुरुष नाही व कारभारीही नाही, ऐसे आहे, आपण पत्रे मात्र पहावी. त्यास पाठकजीबाबा बोलले की, ऐसे आहे तरी विचारणार काय विचारितात, असो. आमची व शास्त्रीबाबांची भेट होईल, पुसतील आणि सुचेल वर्तमान ते त्यांस सांगू, तुम्ही जाणे, आम्हांस वर्तमान व पत्रे समजली. त्याजवर मागती दोनचार वेळ शास्त्रीबाबांस रा त्रिंबकपंताकडून विनंति करविली की, आज्ञेप्रो पत्रे चासकरांनी पाठकजीबाबांस दाखविली. त्याजवर रोज उठोन पाठकजीकडे दर्शनास जात होतो; त्यास एके दिवशी पाठकजींनी सांगितले की, मेघःश्यामपंत येथे येतात, त्यांचा आग्रह विशेष दिसतो, आम्ही सांगू तेच मान्य पडेल ऐसे दिसत नाही, कारण आपला मतलब न जाहल्यास अतित्याई करतील. हरि सिध्देश्र्वर यांणी विनंति केली की, अतित्याई केल्याने प्राप्त होते आहे की काय, आपली आज्ञा अमान्य कोण करील, आम्हांस आपण आज्ञा करतील ती मान्य आहे. त्यांजवर पाठकजी बोलले की, आम्हांकडे चिठ्ठी शास्त्रीबाबांची आली होती, त्याप्रो तुम्ही येऊन वर्तमान व पत्रे दाखविली, याउपरि आमची गांठ पडेल आणि ते पुसतील तेव्हा काय सांगणे ते सांगू, तूर्त तुम्ही आम्हांकडे येत न जाणे ऐसे सांगितले.