Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

त्याचे जातित कथला पडला होता की ठाकुर चवथे मानाचे आधिकारि ।। तो ठाकुर गोत्र कपिल कुळदेवता काळबादेव त्याचा मान काढिला ।। ह्मणोन या नाथरावास रायाने धिःकारिलें । तों दंप त्या नाथरावें धरोन तुर्क पातस्या सुलतान मलिक आलावदिन वडनगरि होता ॥ त्यासी मिळोन सुलतान मलिक सर्क यांचे सैन्य घेवोन फितव्यासि मिळाला ।। तेधवा निका मलिक सरदार सैत्यसमुदायें समवेत खरडि वरोन चाल करोन आला ।। रात्रिचा समई चालावें ।। दिवसा दबा मारित।। या प्रकारें पाताळगंगेश रिघोन कारवि डोगरवाडे अरण्या मधोन दबा देवोन जासुद रवाना केले ॥ आपण पायगावांचे मोरिया वर नवका सिद्ध केल्या ।। रात्रभागे सैन्य संभुजे वरि उतरले ।। तेथे त्या बंदरा पासोन बारा खाड्या अरण्य वोवरियांचे ।। तेथे १२ घटिका रात्रि मध्यें उतरले ।। ते राना मध्यें दबा देवोन राहिले ।। पुढे तेथोन कान्हेरिस येवोन राहिले ।। तेथे बंदोबस्त करोन रात्रसमइं अवघि ठाणि पालत करोन अवघि ठाणि मारिली ।। तेथे युद्ध तुंबळ जालें ।। तुर्क जयो पावला ।। आणि नागरस्या पराजयो जाला ।। शाळिवाहन शके १२७० या समंति तुर्काण जालं ॥ तेधवां सवितावंश आणि सोमवंशि कौल घेवोन रयत होवोन राहिले ।। छ ।। नीमित्य कलयुगिं लक्ष्मीनारायणें कलिस भाष्य दिधली व हरीहर गुप्त जाले आणि ऋषि तेहि बद्रिकाश्रमास गेले ।। आणि वशिष्ट राजगुरु तेहि गेले ।। त्याहि सविता आणि सोमवंशि यांचि विद्या बोध्य केली ।। हे साक्ष चिंतामणिकौस्तुभपुराणि आहे ।। आणि हे कथा सूर्यवंशाचिया राजावळि मध्ये आहे ।। आणि राया बिंबाचा सीका लिहिला आहे ॥ श्लोक ।। नृप गेात्र भारद्वाजं ।। बिंब नाम प्रतिष्ठितं ।। महीपुरिकृतं राज्यं ।। मम मुद्रा विराजितं ।। १ ।। हा राया बिंबाचा सिका ।।

मग तें राज्य तुर्के घेतलें ।। त्या सूर्यवंशियांसि त्याचा अमल्ल खरा करार केला ।। या प्रकारें निका मलिकान राज्य हस्तगत केलें ।। आपण प्रतापपुरास जावोन राज्याचि कमावीस करों लागला ॥ जागोजागीं ठाणि बैसविलीं ।। वसई मध्यें मलिक आलावदिन ठेविला ॥ पुढें सुलतान माहामद सर्क याणे पातश्या जवळ लेहोन पाठविले जर जमी कोकण घेतलें ।। तेधवां पातस्याने लेहोन हुकुम पाठविला की त्या मुलुकाचि कमाविस बरि करावी ।। त्या उपर सुलतान आला वदिन मृत्य पावला ॥ त्याचा पुत्र मलिक आहामद पातस्या जाला ।। त्या मध्यें कुफराणा होवोन भोंगळ्यांहि राज्य घेतलें ॥ त्याहि ते राज्य केलें वरुषे २० ।। त्या उपर लोक त्याही फार पीडिले ।। त लोक मिळोन पातस्यासीं सुलुक देवोन पातस्या येवोन ते मारोन काढिले ।। ते समई मलिक अहामदें अमल वर्षे ३५ पावे तवं राज्य केलें ।। त्या उपर पातस्या मूत्य पावला शाळिवाहन शके १३१३ ।। त्याचा पुत्र मलिक बाहादुर पातस्या जाला ।। ते समई साष्टि मध्यें प्रतापुरास निका मलिक उंबराव पाठविला ॥ त्याणे माहिम बिंबस्थानि लोक आणि फौजदार पाठविला ।। दवणे प्रांति बाहादुरखान बाब करोन यावत् वसई प्रांत त्यास जाला ॥ त्याणे सींधे शेषवंशि बाहादरपुरि आणोन पुरा वसविला ॥ यावत् साष्टि मधोन वालिवा होवोन जमा सिंध्याचा आपले ताबिन ठेविला ॥ मलिक आलावदिन होता त्यास विसामा गड चांदुळवाडियेचा किल्लेदार केला ॥ त्याणे त्या पर्वता खालिं बुराणपुर वसविलें ॥ व दक्षणप्रांति अमदानगर किराठ वसविलें ।। ऐसे राज्य करितां वर्षे ६४ भरली ।। त्या नंतर निकामलिक या समागमे सैन्य देवोन रवाना केला ॥ त्याण्हे सीद माहाल विलाईत घेतली ।। त्या वर देवगरी काबिज केलि ।। तेथे हि म्लेंछ जये पावले ।। रामदेवराजा आणि हेमाडपंत हे दोघे गुप्त जाले ।। त्या उपर माहाराष्ट्र-राजा वरि पातस्याहि हल्ला जाला ।। मग सर्व विलाथ यावत् देवगिरी राज्य दस्त केली ॥ त्या नंतरे मलिक बाहादुर प्रमादला ।। ते समई श्रीपंढरपुरी नामदेव सिंपा हरिभक्त होता ।। तो श्रीवाराणसिचे यात्रेस जातां पातस्याने बोलाविला ॥ हिंदु कुफराणदार ह्मणोन त्याचा अंत पाहों लागला ।। त्यास खाने सानक कंदुरि मोहोरे ठेविली ।। भक्ष ह्मणोन बळत्कार करों लागला ॥ ते समई श्रीविठल भक्तकैंवारि ॥ त्या कंदुरिचि पुष्प जाली ॥ ते करामत देखोन पातस्या आश्चिर्य पावला ॥ तेधवां नामदेवा प्रत पातस्या विचारों लागला ॥ जर तु जातिचा कोण होसी ।। त्याणे सांगितलें की माझि जात सिंपा।। यैसे बोलिलें ॥ मग तो नामा दस्त केला ॥ त्याचा आशिर्वाद पातस्यासिं फळला ।। तो पातस्या प्रमादला ।। त्याचा पुत्र सुलतान तोगिल ।। त्याचा पुत्र सुलतान पेरोजस्या ॥ येसे साता वर्षा मध्यें तीन पातस्याहि जाले ।। तदनंतरें प्रतापस्याचे राखे पासोन पुत्र देवशा ॥ त्याचा पुत्र रामस्य ॥ तो रामस्या फुंड होवोन १५७ गावं वसविले ।। ते समईं त्या प्रांतिचें नाव रामनगर ठेविलें ॥ तो तेथिल राज्य युगमहिमे स्तवं करों लागला ॥