Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

 

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण हे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता, २५ नोव्हेंबर, १९८४ रोजी मा. यशवंतराव चव्हाण मृत्युनंतर त्यांचे हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी यशवंतरावांचे अनुयायी, सुहृद व कार्यकर्ते एकत्र आले. त्यातूनच १७ सप्टेंबर, १९८५ रोजी मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे पक्षनिरपेक्ष व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या जनमानसाला संचित करणा-या प्रश्नांचा खल करावा आणि या चर्चेतून कार्य करणारी माणसे तयार व्हावीत ही प्रतिष्ठानची भूमिका आहे. या राकट, कणखर, दगडांच्या देशाचा स्वाभिमान अभंग राहावा ही महाराष्ट्रातील जनमानसाची इच्छा आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा प्रवास हा या आकांक्षेच्या पूर्ततेचा आहे. अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. www.ycpmumbai.com